Easy way to Cook Gajar Halwa Saam tv
लाईफस्टाईल

Gajar Halwa Recipe: न किसता सोप्या ट्रिक्सने बनवा शाही गाजरचा हलवा, पटकन बनेल; पाहा स्वादिष्ट रेसिपी

Easy way to Cook Gajar Halwa: हिवाळा महिना म्हटलं की, हमखास गोडाचा पदार्थ म्हणून गाजरचा हलवा बनवला जातो. गाजरचा हलवा चाखण्याचा आनंद देखील दरवेळी वेगळाच असतो.

कोमल दामुद्रे

How To Make Gajarcha Shahi Halwa :

हिवाळा सुरु झाला की, बाजारात सर्वत्र गाजर पाहायला मिळतात. त्यात मार्गशीर्ष महिना म्हटलं की, हमखास गोडाचा पदार्थ म्हणून गाजरचा हलवा बनवला जातो. गाजरचा हलवा चाखण्याचा आनंद देखील दरवेळी वेगळाच असतो.

गाजराचा हलवा बनवताना त्याचा खिसावे लागते. त्यामुळे हा हलवा बनवताना अनेकदा नाकी नऊ येतात. परंतु, आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही सोप्या ट्रिक्सने शाही गाजरचा हलवा बनवू शकता, पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • गाजर - अर्धा किलो

  • मावा - २०० ग्रॅम

  • दूध (Milk) - अर्धा लीटर

  • साखर (Sugar) - २५० ग्रॅम

  • वेलची - ४ ते ५

  • सुका मेवा

  • तूप

2. कृती

  • गाजरचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी ते धुवून सोलून घ्या. गाजर किसण्याऐवजी त्याचे तुकडे करुन प्रेशर कुकरमध्ये ठेवा.

  • ५ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. कुकरमधून गाजर काढा. ते मॅश करुन घ्या.

  • त्यानंतर गाजर पॅनमध्ये घेऊन त्यातील सगळे पाणी काढून टाका.

  • पाणी सुकल्यावर गाजर काढून घ्या, त्याच कढईत तूप घाला. गाजर तूपात चांगले शिजवून घ्या.

  • गाजराचा रंग सोनेरी झाल्यानंतर त्यात दूध घालून गाजर नीट शिजवून घ्या.

  • गाजरचे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात मावा आणि वेलची घाला. मंद आचेवर २ मिनिटे शिजवून घ्या.

  • ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा गाजरचा शाही हलवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT