Relationship Tips
Relationship Tips  Saam tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : कधी गोड बोला तर, कधी खोट ! पार्टनरशी खरं न सांगणेही फायदेशीर, बहरेल नव्याने तुमचं प्रेम...

कोमल दामुद्रे

Relationship Tips For Couple : अनेकदा नात्यात अशी काही वळणं येतात जिथे पार्टनरला आपण सगळं खरं सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु, काहीवेळेस नात्यात अशा काही गोष्टी येतात की, खरं सांगितल्यामुळे नातं तुटण्याची वेळ येते. बरेचदा आपल्याला असं वाटते की, पार्टनरला खरं सांगितल्यामुळे त्याचा आपल्यावरचा विश्वास अधिक दृढ होईल पण होतं काही उलटचं...

लग्न झाल्यानंतर बरेचदा असे होते की, कामाच्या गडबडीमुळे आपल्याला जोडीदाराला वेळ देता येतं नाही त्यामुळे आपल्याला नात्यात (Relation) अनेक समस्या निर्माण होतात. जरी आपल्याकडे वेळ नसला तरी काही गोष्टींची काळजी (Care) घेतल्यास आपले नातं अधिक चांगल्या प्रकारे बहरु शकते. जाणून घेऊया ते कसे.

1. संवाद

कोणत्याही नात्यात संवाद हा महत्त्वाचा पाया असतो. तुमच्याकडे कितीही वेळ नसला तरी आजकालच्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण आपल्या पार्टनरला एखादा छान, रोमँटिक मॅसेज पाठवला तरीही तुमचा पार्टनर (Partner) खुश होईल.

2. प्रशंसा करा

जेवण बनवल्यानंतर किंवा कधी तरी आपल्या पार्टनरची स्तुती करा. कोणत्याही नात्यात पार्टनरला त्याने केलेल्या कृतीची प्रशंसा केली तर ती गोष्ट मनापासून पुन्हा करण्यास अधिक उत्साही असतो. त्यासाठी जेवणाची निदान खोटी प्रशंसा करायला हवी.

3. दिलेल्या गोष्टीचं समाधान

बरेचदा आपण आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग विसरतो. पण दोघा जोडीदारांपैकी एका जोडीदाराला ते बरोबर लक्षात असते. अशावेळी तुम्ही दिलेल्या भेटवस्तूचं कौतुक करा व स्वत:ची चुक देखील मान्य करायला शिका. यामुळे तुमच्या नात्यात आलेला दुरावा कायमा दूर होऊ शकतो.

4. विनोद नकोच

बरेचदा असे होते की, आपला पार्टनर हा आपल्या चिडलेला असतो किंवा कोणती तरी महत्त्वाची गोष्ट सांगत असताना आपण त्याची खिल्ली उडवतो त्यामुळे नात्यात अनेक प्रसंग उभे राहातात. त्यामुळे जोडीदाराची चेष्टा करण्याऐवजी त्यांच्या बदलाचे कौतुक करा. तसेच, तुम्ही त्यांना प्रेमाने काही सूचना देऊ शकता.

5. पाठिंबा

अनेकवेळा लोकांना जोडीदाराचे काही निर्णय आवडत नाहीत आणि जोडपे विचार न करता या निर्णयांवर प्रतिक्रिया देतात. अशा परिस्थितीत करिअर बदलण्यासारख्या इतर निर्णयांवर तुमच्या जोडीदाराच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका. जोडीदाराच्या कोणत्याही निर्णयावर आक्षेप असूनही तुम्ही खोटे बोलून त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकता. यानंतर, तुम्ही पार्टनरला त्यांच्या निर्णयांशी संबंधित फायदे आणि तोटे प्रेमाने समजावून सांगू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anjali Arora Debut Bollywood : ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; थेट सीतेची भूमिका साकारणार

Gulabrao Patil : आमच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांच्या सभांचा फरक पडणार नाही; मंत्री गुलाबराव पाटील

Amravati : अवैध रेती उपसा प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल, चाैघे अटकते; 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त

ICSE Result News | ICSE दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी

Hemant Soren: वाढलेली दाढी, गळ्यात मफलर; अटकेनंतर हेमंत सोरेन पहिल्यांदाच तुरूंगाबाहेर, नवा फोटो पाहिलात का?

SCROLL FOR NEXT