पनीर म्हटले की, शाकाहरी प्रेमींच्या तोंडाला पाणीच सुटते. व्हेज थाळीमध्ये सगळ्याचा आवडता पदार्थ पनीर. दिवाळीच्या काळात आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्या घरी अनेक पाहुणे येतात.
या दिवशी आपण जेवणाच्या थाळीमध्ये काहीतरी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, पालक पनीर, पनीर भुर्जी, पनीर मसाला तिच तिच भाजी खाऊन तुम्हालाही वैताग आला असेल तर भाऊबीजला ट्राय करा पनीर पसंदा. घरच्या घरी कशी बनवायची पाहूया रेसिपी.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पनीर २०० ग्राम | Paneer 200 Gram
किसलेले पनीर १०० ग्राम | Grated Paneer 100 Gram
बदाम ४ ते ५ | Almonds 4 to 5
काजू ४ ते ५ | Cashew Nuts 4 to 5
बेदाणे ४ ते ५ | Bedane 4 to 5
पिस्ते २ ते ३ | Pistachios 2 to 3
बारीक चिरलेला पुदिना | Finely Chopped Mint Leaves
बारीक चिरलेली हिरवी मिरची | Finely Chopped Green Chilly
बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Coriander
बारीक चिरलेले आले १ इंच | Finely Chopped Ginger 1 inch
गरम मसाला १/४ छोटा चमचा | Garam Masala ¼ tsp
मीठ | Salt
पिठी साखर १/४ छोटा चमचा | Sugar Powder ¼ tsp
कॉर्नफ्लोअर ३ ते ४ मोठे चमचे | Corn Flour 3 to 4 tbsp
हळद १/४ छोटा चमचा | Turmeric Powder ¼ tsp
काजू १० ते १२ | Cashew Nuts 10 to 12
कांदे ४ मध्यम | Onion 4 Medium Size
उभी चिरून हिरवी मिरची २ | Green Chilly with Straight Cut 2
तेल २ मोठे चमचे | Oil 2 tbsp
तमाल पत्र १ | Bay Leaf 1
मसाला वेलची १ | Masala Cardamom 1
हिरवी वेलची २ | Green Cardamom 2
टोमॅटो १ मोठा | Tomato 1 tbsp
मीठ १/२ छोटा चमचा | Salt ½ tsp
पाणी १.५ कप | Water 1.5 cup
आले लसूण पेस्ट १ छोटा चमचा | Ginger Garlic Paste 1 tsp
हळद १/२ छोटा चमचा | Turmeric Powder ½ tsp
बेडगी मिरची पावडर १ छोटा चमचा | Bedagi Chilly Powder 1 tsp
धने पूड १ छोटा चमचा | Coriander Powder 1 tsp
जिरे पूड १ छोटा चमचा | Cumin Powder 1 tsp
तेल २ मोठे चमचे | Oil 2 tbsp
बटर २ मोठे चमचे | Butter 2 tbsp
तमाल पत्र १ | Bay Leaf 1
तयार ग्रेव्ही | Ready Gravy
मीठ | Salt
गरम मसाला पावडर १ छोटा चमचा | Garam Masala Powder 1 tsp
फ्रेश क्रीम १/४ कप | Fresh Cream ¼ cup
सर्वप्रथम कढई घेऊन त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात तमालपत्र, मोठी वेलची, मिरची घाला.
नंतर त्यात कांदा घालून परतवून घ्या. कांदे लालसर झाल्यानंतर त्यात टोमॅटो, भिजवलेले काजू आणि मीठ घालून परतवून घ्या.
त्यानंतर त्याला उकळी येईपर्यंत झाकूण ठेवा. गॅस बंद करुन त्यातीस तमालपत्र आणि वेलची काढून घ्या.
पनीरचे मोठ्या आकारात एकसारखे तुकडे करुन घ्या. त्यातील थोड्या पनीरला किसून घ्या.
किसलेल्या पनीरमध्ये बदामाचे काप, बेदाण्याचे काप, काजूचे काप, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेल आले, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ, १ चमचा पिठीसाखर घालून चांगले मिक्स करा.
तयार मिश्रण पनीरवर स्टफ करुन घ्या. नंतर स्लाइसला बंद करा. कॉनफ्लावर घेऊन त्यात हळद घालून पेस्ट तयार करा.
पेस्टमध्ये तयार पनीर स्टफ घोळवून घ्या. नंतर कॉनफ्लॉवरने पनीरच्या साइडच्या कडा बंद करा. तयार स्टफिंग तेलात तळून घ्या.
नंतर तेलात तळलेला मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर वाटीमध्ये आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणे पावडर, हळद पावडर मिक्स करा. त्यात थोडेसे पाणी घालून चांगले एकजीव करा.
नंतर कढईत तेल आणि बटर घाला. त्यात मसाल्यांची पेस्ट, तयार ग्रेव्ही घालून चांगली परतून घ्या. नंतर त्यात थोडे पाणी घाला.
त्यात चवीपुरता मीठ आणि गरम मसाला घाला. चांगले मिसळून घ्या, वरुन फ्रेश क्रीम घाला. नंतर तयार पनीरचे दोन भाग करा.
सर्व्हिंग प्लेटमध्ये पनीर ठेवून वरुन तयार ग्रेव्ही घाला. सर्व्ह करा पनीर पसंदा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.