थंडी आणि कोरा वारा, कडक ऊन, कमी पाणी पिणे किंवा ओठ वारंवार ओठ जिभेने ओले करण्याची सवय यामुळे ओठ कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. अनेकदा ओठांना चिरा जातात आणि ओठांची त्वचा निघू लागते. अशा वेळी ओठ मऊ आणि मॉइश्चराइज ठेवण्यासाठी लोक लिप बामचा वापर करतात.
बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे लिप बाम सहज उपलब्ध असतात, परंतु जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने ओठांची काळजी घ्यायची असेल, तर तुम्ही घरच्या घरी बीटरूटच्या मदतीने अगदी सोप्या पद्धतीने लिप बाम बनवू शकता. हे ओठांना खोलवर मॉइश्चराइज तर करतेच, शिवाय त्यांना एक नैसर्गिक गुलाबी रंगही देते.
जाणून घेऊया घरच्या घरी बीटचा लिप बाम कसा बनवायचा आणि त्यासाठी कोणत्या साहित्याची गरज असते.
१ चमचा खोबरेल तेल (खोबरेल तेलाऐवजी एरंडेल तेलही वापरू शकता)
१ चमचा बदामाचे तेल
१ चमचा व्हॅसलीन
१-२ थेंब व्हिटॅमिन ई ऑइल
लिप बाम बनवण्यासाठी सर्वप्रथम बीट चांगले धुवून उकळून घ्या.
बीट मऊ झाल्यावर ते बाहेर काढा आणि थंड होऊ द्या.
थंड झाल्यानंतर बीटची साल काढून ते चांगले बारीक करून घ्या.
आता एका छोट्या भांड्यात मॅश केलेले बीट, खोबरेल तेल, बदामाचे तेल, व्हॅसलीन आणि व्हिटॅमिन ई ऑइल टाका.
सर्व साहित्य चांगले एकत्र करा आणि मंद आचेवर गरम करा.
त्यानंतर गॅस बंद करा आणि तयार मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
आता हे एका स्वच्छ आणि छोट्या कंटेनरमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून द्या.
थंड झाल्यानंतर तुमचा घरगुती बीट लिप बाम तयार होईल. तुम्ही गरजेनुसार तो ओठांवर लावू शकता.
बीट ओठांना हलकासा नॅचरल टिंट (गुलाबी रंग) देण्यास मदत करतो.
खोबरेल आणि बदामाचे तेल ओठांचे कोरडेपण कमी करून त्यांना मऊ ठेवतात.
बी वॅक्स किंवा व्हॅसलीन ओठांवर एक संरक्षक थर तयार करते, ज्यामुळे ओठांमधील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.