Pure Ghee Saam TV
लाईफस्टाईल

Pure Ghee Recipe: दुकानातलं भेसळयुक्त तूप खाण्यापेक्षा घरच्याघरी बनवा शुद्ध तूप; वाचा गावरान रेसिपी

How to Make Ghee From Milk: भेसळयुक्त तूप खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर याचे उलट परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे ते टाळण्यासाठी घरच्याघरी शुद्ध तूप कसं बनवायचं याची महिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

देसी घी म्हणजेच शुद्ध तूप प्रत्येक व्यक्तीच्या आहारात असणं गरजेचं आहे. तूप खाल्ल्याने आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या अपल्याला होतच नाहीत. तेल खाल्ल्याने शरीरातील चर्बी आणि कोलेस्ट्रॉल वाढतं, त्यामुळे तेलापेक्षा तूपाचे सेवन जास्त करणे गरजेचे आहे.

बाजारात देसी घी किंवा शुद्ध तूप अशा जाहिरातीत अनेक व्यक्ती तूप विकतात. मात्र हे तूप शुद्ध आहे की नाही याची काही गॅरंटी नसते. मात्र तरीही अनेक व्यक्ती हे तूप विकत घेतात. भेसळयुक्त तूप खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर याचे उलट परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे ते टाळण्यासाठी घरच्याघरी शुद्ध तूप कसं बनवायचं याची महिती जाणून घेऊ.

पहिली सोप्पी पद्धत

  • तुम्हाला घरच्या घरी तूप बनवायचं असेल तर ४ ते ५ दिवस घरी फूल फॅट असलेलं दूध घेऊन या.

  • दूधाला चांगली उकळी आल्यानंतर त्याची साय एका भांड्यात काढून घ्या.

  • दूधाची साय दररोज त्या एकाच भांड्यात साठवत राहा.

  • ४ ते ५ दिवसांत जी काही मलयी किंवा साय साठत राहील ती फ्रिजमध्ये ठेवा.

  • फ्रिजमध्ये न ठेवल्यास साय खराब होऊ शकते.

  • त्यानंतर तूप बनवताना सायीचा फ्रिजमधील टोप बाहेर घ्या.

  • साय आणि टोपाचं तापमान नॉर्मल झाल्यावर टोप गॅसवर मंद आंचेवर तापण्यासाठी ठेवा.

  • पुढे या टोपात सतत एका चमच्याने हालवत राहा.

  • त्यामुळे मलयी खाली चिकटनार नाही आणि हळूहळू तूप मलईपासून वेगळे होईल.

  • त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने तूप गाळून घ्या.

दुसरी पद्धत

  • बटरपासून देखील तूप बनवता येते. या पद्धतीमध्ये तुम्हाला जास्त कॉन्टीटीमध्ये तूप मिळतं.

  • त्यासाठी आधी फूल फॅट असलेलं दूध घ्या.

  • फूल फॅट दूध एका मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्या.

  • मिक्सरला फिरवताना यात बर्फाचे तुकडे टाका.

  • बर्फ आणि थंड पाण्याने दूध फेटल्याने त्यातील बटर वेगळं होतं.

  • बटर वेगळं झाल्यानंतर त्यात पुन्हा थोडा बर्फ टाकून घ्या.

  • जास्तीत जास्त दूध निघून जाऊन फक्त लोणी उरेल.

  • त्यानंतर हे लोणी गॅसवर बारीक आंचेवर तापवून घ्या.

  • तूप तयार झाल्यावर ते पूर्ण थंड होऊ द्या आणि गाळणीने गाळून एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा.

  • या दोन सोप्प्या आणि सिंपल स्टेप्स फॉलो करून तुम्ही देखील घरी तूप बनवू शकता. विविध ब्रँडचे तूप फार महाग मिळते. तुम्ही घरच्याघरी तूप बनवल्यास पैशांची देखील बचत होईल आणि तुम्हाला भेसळयुक्त नाही तर शुद्ध तूप खाण्यास मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : खासदार निलेश लंके यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे

Actress : काही दिवसांपूर्वीच नवऱ्याच्या घरी परतली, मुलं घराबाहेर गेल्यानंतर अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला

Cabbage Cutlets Recipe : कोबीचं कुरकुरीत कटलेट, संध्याकाळच्या भुकेसाठी चटपटीत पदार्थ

पुणे-सातारा बंधाऱ्यावर कार कोसळली, पाहा थरारक व्हिडिओ

Shravan: श्रावणात साप नजरेस पडणं शुभ की अशुभ?

SCROLL FOR NEXT