Gauri Pujan 2022
Gauri Pujan 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Gauri Pujan 2022 : आली गौराई अंगणी, घाली लिंबलोण सडा..! लाडक्या 'गौराई'ला ठेवा कोकणातला पारंपारिक पदार्थ

कोमल दामुद्रे

Gauri Pujan 2022 : गौराईच्या येण्याची वाट प्रत्येक स्त्री पाहते कारण ती माहेरवाशिण असते ना! रुणुझुणुच्या पाखरा, जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी, घाली लिंबलोण सडा अशी अनेक गाणी म्हणत तिचे आगमन होते.

विघ्नहर्त्या गणेशापाठोपाठ समृद्धी घेऊन घरी महालक्ष्मीचे आगमन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठीला किंवा सप्तमीला होते. तिची स्थापना ही वेगवेगळ्या प्रकारे होते. कोकणात गौरी-गणपतीचा हा सण मोठ्या उत्सवात साजरा (Celebrate) केला जातो. या दिवसात माहेरवाशिण आलेल्या गौरीला पंचपक्वान किंवा तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो.

या दिवसात प्रत्येक कोकणी माणूस हा पदार्थ हमखास बनवतो तो म्हणजे हळदीच्या पानांच्या पातोळ्या. हा पारंपारिक पदार्थ असून गोडाचा आहे. जाणून घेऊया, याची रेसिपी विष्णू मनोहर यांच्याकडून.

साहित्य -

तांदळाची कणी - ३ १/२ वाटी

गूळ - १ वाटी

मीठ - चिमूटभर

हळद

नारळाचे दूध - १/२ वाटी

वेलची पावडर

तूप

सालासहित किसलेली काकडी - १ वाटी

हळदीची पाने

कृती -

१. तांदळाच्या कणीला दोन पाण्याने धुवून घ्या. एका पातेल्यात किसलेली काकडी, गुळ व हळद घालून चांगले परतवून घ्या. चिमूटभर मीठ व वेलची पूड घाला.

२. तांदळाच्या कणीतल पाणी काढून घ्या. तयार काकडीच्या मिश्रणात तूप, नारळाचे दूध (Milk) व तांदळाची कणी घालून शिजवून घ्या.

३. हळदीच्या पानांची देठ कापून घ्या. हळदीच्या पानाला तूप लावून त्यात तयार काकडीचे सारण घाला. पाने दुमडून त्याला मोदकासारखी उकड काढून घ्या. सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Shortage : सीना कोळेगाव प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणीसाठा; परंडा तालुक्यात सिंचनाचा प्रश्न गंभीर

Today's Marathi News Live : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल

Pune Crime News : किरकोळ कारणावरून पुण्यात तुफान हाणामारी; 20 जणांच्या टोळक्याचा दोघा तरुणांवर हल्ला, पहा Video

Reels साठी पोरांनी महागड्या कार चोरल्या, सोशल मीडियावर घालायचा होता धुमाकूळ, आता बेड्या पडल्या

Sanju Samson Record: संजू सॅमसनचा मोठा कारनामा! या रेकॉर्डमध्ये रोहित, धोनी अन् विराटलाही सोडलं मागे

SCROLL FOR NEXT