Gauri Pujan 2022 : माहेरवाशिण गौरीला तिखटाचा नैवेद्य का दाखवला जातो ?

महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा आणि कनिष्ठा, सखी तसे पार्वती अशा जोडीने त्यांना घरात आणले जाते.
Gauri Pujan 2022
Gauri Pujan 2022Saam Tv
Published On

Gauri Pujan 2022 : माहेरवाशिण असणाऱ्या गौरीचे आज घरोघरी आगमन होईल. सुखी संसारासाठी व घरात भरभराटी राहो यासाठी गौरीचे पूजन केले जाते. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा आणि कनिष्ठा, सखी तसे पार्वती अशा जोडीने त्यांना घरात आणले जाते.

खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या शाडूच्या गौरी तसेच पितळेच्या मूर्ती, तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसविण्यात येतात. अशीच आपली परंपरा टिकवत सर्व कुटुंबीय दरवर्षी गणेशोत्सव आणि गौरी पूजनादरम्यान एकत्रित येऊन रात्रभर जागर करत गौरीची सजावट (Decoration), तिचा अलंकार करीत असतात. गौरी पुजन झाल्यावर आपल्या गणरायाला गोड जेवणाचे तर गौराईला तिखट म्हणजेच मांसाहार जेवणाचा नैवेद्य दाखवतात.

Gauri Pujan 2022
Skin Care Tips : गौरी पूजनाच्या दिवशी सुंदर दिसायचे आहे ? मेकअप करण्यापूर्वी या गोष्टी करा, दिवसभर चमकेल त्वचा

ज्येष्ठा गौरींना दाखवलेल्या नैवेद्यात खेकड्याचे कालवण, मासे, निवटे, कोंबडीवडे, भाकरी, भात अशा अनेक मांसाहार खाद्यपदार्थांचा समावेश असतो.

तिखटाचा नैवेद्य दाखवण्यामागची अख्यायिका –

पौराणीक कथेत गौराईचे शंकराबरोबर लग्न (Wedding) झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतिला आपले भूतगण दिले. हे भूतगण तिच्या रक्षणासाठी दिलेले असून गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला. त्यांनी तिची पूजा केली. तिला गोडधोड खायला बनवलं. तिचा चांगला पाहुणचार केला.

गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्व जण विसरले. पण गौराई त्यांना विसरली नाही. शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात रहायची सवय आणि मांस आवडत असे. त्यांची अडचण गौरीला समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली. त्यावेळी मांसाहार वर्ज्य असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ तेव्हा दिसून आली. तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले.

Gauri Pujan 2022
Gauri Pujan : 'गौराईला' पुरणपोळीचा नैवेद्य दाखवताय ? या पध्दतीने बनवा, होतील मऊ लुसलुशीत

या प्रसंगाची आठवण ठेऊन जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मांसाहार केले जाते. कारण ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे. त्या दिवशी मांसाहार करतात पण त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जात नाही. तर तिच्या सोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com