Gauri Pujan : 'गौराईला' पुरणपोळीचा नैवेद्य दाखवताय ? या पध्दतीने बनवा, होतील मऊ लुसलुशीत

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पुरणपोळी बनवण्याची योग्य पध्दत माहित नसते. पुरणपोळी बनवताना ती फाटते किंवा कडक होते.
Gauri Pujan, Purnapoli
Gauri Pujan, PurnapoliSaam Tv

Gauri Pujan : कोकणापासून राज्यभरात सगळीकडे उद्यापासून गौरीचे आगमन होईल. गणेशोत्सवाचा (Ganesh) हा काळ महाराष्ट्रात सगळ्यात मोठा व लोकप्रिय सण आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात गौरीचे पारंपारिक रित्या पूजन व स्वागत केले जाते. आली गवर आली अशी अनेक गाणी लावून तिला सन्मानाने घरात घेतले जाते. परंतु, सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी केल्या जातात. खरेतर काही भागात गौराईला तिखटाचा नैवेद्य दिला जातो तर कुठे गोडाचा. त्यासाठी खीर व पुरणपोळीचा नैवेद्य गौरीला वाढला जातो.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पुरणपोळी बनवण्याची योग्य पध्दत माहित नसते. पुरणपोळी बनवताना ती फाटते किंवा कडक होते. एकदम लुसलुशीत मऊशार पुरणपोळी बनवायची आहे तर जाणून घ्या त्याची योग्य पध्दत

Gauri Pujan, Purnapoli
World Coconut Day 2022 : यंदाचा 'कोकोनट डे' बनवा खास, गणोबाला नैवेद्यात ठेवा 'हे' नारळाचे झटपट पदार्थ

डाळ याप्रकारे शिजवा -

कुकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून चणाडाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. डाळ शिजली की, त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी (Water) वापरून कटाची आमटी तयार करता येते.

कणिक या पद्धतीने मळा -

पोळी मऊसूत गुळगुळीत होण्यासाठी कणीक बारीक चाळणीने चाळून घ्यावी. त्यात थोडं मीठ घालून सैलसर भिजवून अर्धा तास तरी ती तशीच ठेवावी.

Gauri Pujan, Purnapoli
Gauri Pujan 2022 : आली गवर आली..! माहेरवाशीण आलेल्या गौराईचा ओवसा कसा भराल ?

पुरण शिजवताना घ्या ही काळजी

पुरण शिजवताना ते मंद आचेवर शिजवावे. पुरण फारच मऊ असताना गॅस वरुन उतरवले तर त्यात थोडा पाण्याचा अंश राहतो. पुरण फार कोरडं होईपर्यंत गॅसवर ठेवलं तर ते पोळी लाटताना नीट पसरले जात नाही. पुरण बरोबर झाल्याचा निकष म्हणजे त्यामधे झारा उभा ठेवला तर काही सेकंद तो उभा राहू शकतो. असे झाले की, पुरण थंड करण्यास ठेवावे.

पोळी या पद्धतीने भाजा

पुरणपोळी भाजताना मध्यम आचेवर ठेवा. तव्यावर पोळी भाजताना ती सोनेरी लालसर रंग येईपर्यंत भाजा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com