Skin Care Tips : गौरी पूजनाच्या दिवशी सुंदर दिसायचे आहे ? मेकअप करण्यापूर्वी या गोष्टी करा, दिवसभर चमकेल त्वचा

मेकअप करणे हा स्त्रियांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा दैनंदिन दिनक्रम आहे.
Skin Care Tips
Skin Care Tips Saam Tv
Published On

Skin Care Tips : सण आला की, स्त्रियांना नटायला अधिक आवडते, त्यात सुंदर दिसायचे असेल तर काय करु आणि काय नको हा प्रश्न पडतो. ऐनवेळी किंवा पाहुणे मंडळी आल्यानंतर नेमके अशावेळी मेकअप करायला मिळत नाही.

मेकअप करणे हा स्त्रियांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा दैनंदिन दिनक्रम आहे. चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच त्याचा आत्मविश्वास देखील वाढवण्याचे काम करते.

सणाच्या (Festival) काळात सुंदर दिसण्यासाठी आपण महागड्यातले महागडे पदार्थ चेहऱ्यासाठी वापरत असतो. त्यासाठी प्राइमरचा देखील वापर करतो. मेकअप करताना प्राइमर लावल्यानंतर त्याचा आपल्याला फायदा होतो का ? हा प्राइमर मेकअप करण्याच्या आधीची स्टेप असली तरी अशा परिस्थितीत अनेक महिला मेकअपमध्ये प्राइमर लावायला अजिबात विसरत नाहीत.

Skin Care Tips
लिपस्टिकच्या या शेड्स मॅच होतील चेहऱ्याच्या प्रत्येक रंगाला!

प्राइमरचे फायदे (Benefits) फार कमी महिलांना माहिती आहेत. आम्‍ही तुम्‍हाला प्राइमर लावण्‍याच्‍या काही फायद्यांविषयी सांगत आहोत, जे जाणून घेतल्यानंतर तुम्‍हाला हवे असले तरीही प्राइमर लावणे टाळता येणार नाही.

त्वचा संरक्षण-

मेकअप करण्यापूर्वी प्राइमर वापरल्याने मेकअपच्या दुष्परिणामांपासून त्वचेचे संरक्षण होते. प्राइमर फाउंडेशन आणि त्वचेमध्ये थर तयार करतो. त्यामुळे मेकअपच्या रासायनिक उत्पादनाचा त्वचेवर परिणाम होत नाही आणि तुमची त्वचा पूर्णपणे सुरक्षित राहते.

Skin Care Tips
Skin Care Tips : ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी आणि टाळण्यासाठी या सोप्या टिप्सचा वापर करा

मेकअप टिकण्यासाठी -

प्राइमर मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी देखील उपयुक्त आहे. जिथे उन्हाळा आणि पावसाळ्यात सामान्य मेकअप लवकर वितळू लागतो. दुसरीकडे, प्राइमर लावल्यानंतर, मेकअप बराच काळ त्वचेवर टिकून राहतो.

त्वचा ऑक्सिडाइझ होणार नाही -

मेकअप करण्यापूर्वी प्राइमर न लावल्यास फाऊंडेशन आणि कन्सीलरची रसायने त्वचेत ऑक्सिडायझिंग होऊ लागतात. त्यामुळे तुम्हाला त्वचेवर मेकअपचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतात. त्याच वेळी, प्राइमरचा वापर करून, त्वचेचे संरक्षण करण्यासोबतच फाउंडेशन आणि कन्सीलरचा हलका वापर करून आपण मेकअप लुक मिळवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या ब्युटीशियनशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com