Rabadi Recipe
Rabadi Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Rabadi Recipe : गोड खाण्याचे शौकिन आहात? घरच्या घरी बनवा रबडी, पाहा रेसिपी

कोमल दामुद्रे

Rabadi Recipe : रबडी म्हटंल तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. गोडा मधील रबडी हा प्रकार दुधापासून बनवला जातो. वृद्धांपासून ते लहान मुलांसह सगळ्यांचं गोड खायला फार आवडते. तुमच्या घरात देखील गोड खाणारी माणसं असतील तर तुम्ही अशा पद्धतीने रबडी बनवा. तुम्ही रबडी कमी गोड बनवली तरीसुद्धा रबडीची चव बदलणार नाही.

दुधापासून तयार केलेल्या रबडीमध्ये ड्राय फुड्स आणि केसर घालून अगदी बजारमधली रबडी तुम्ही घरी बनवू शकता.

हलवाई सारखी रबडी घरीच बनवायची असेल तर या पद्धतीने बनवा.

रबडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • दोन लिटर दुध

  • पन्नास ग्रॅम बदाम

  • वीस ग्रॅम पिस्ता

  • अर्धा चमचा वेलची पूड

  • चार ते पाच केसर

  • साखर (Sugar) चवीनुसार

Rabadi Recipe

रबडी बनवण्याची योग्य पद्धत :

  • रबडी बनवण्यासाठी एक मोठं पातेल घ्या. मोठ्या पातेल्यामुळे रबडी चांगल्या प्रकारे बनेल.

  • पातेल गॅसवर (Gas) ठेवा आणि दोन लिटर मलाई असलेलं दूध (Milk) टाका.

  • फास्ट गॅसवर दुधाला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर दुध उकळेल. तेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम कमी करू शकता.

  • कमी गॅसवर दूध 10 ते 15 मिनिटे उकळवून घ्यायचं आहे. दूध तळाला लागू नये म्हणून दूध सतत हलवत राहायचं आहे.

  • दुधावर येणाऱ्या साईला पातेल्याच्या किनारील लावून घेत दूध सतत ढवळत राहायचं आहे.

  • अशाप्रकारे जेवढ्या वेळा दुधावर मलाई येईल तेवढं वेळ मलाई किनारीला लावत जायची आहे.

  • जेव्हा दुधाचा रंग थोडासा तपकिरी होईल तेव्हा त्यामध्ये साखर टाकून ढवळून घ्यायचं आहे.

  • त्याचबरोबर केसर, ड्राय फूड आणि वेलची पूड घालून दुधाला अजून शिजवून घ्यायचं आहे.

  • त्यानंतर जेव्हा दूध व्यवस्थित शिजेल तेव्हा पातेल्याच्या किणारीला लागलेली मलाई काढून टाका. यामुळे रबडीची चव वाढेल.

  • त्यानंतर दोन ते तीन मिनिटे आणखी शिजवून गॅस बंद करून टाका.

  • नंतर रबडी थंड झाल्यावर त्यावर बारीक पिस्ता कापून टाका आणि बदामचे बारीक काप करून सजवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT