Homemade Protein Powder Recipe : आजकाल प्रत्येकाला फिट राहायला आवडते. बॉडी बनवण्यापासून ते ती जशीच्या तशीच राहावी असा प्रत्येकाचा अट्टहास असतो. आजकाल लोक तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी दैनंदिन दिनचर्यामध्ये जिमचा समावेश करतात.
ट्रेनर्स जिममध्ये जाणाऱ्यांना प्रोटीन पावडरची घेण्यास सांगतात, कारण ते अधिक ऊर्जेचे स्रोत आहे. लोक प्रोटीन पावडर बाजारातून किंवा ऑनलाइन खरेदी करतात. पण, तुम्हाला माहित आहे का की हे आरोग्यदायी पद्धतीने घरी बनवता येते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या पदार्थांनी तुम्ही घरी प्रोटीन पावडर बनवू शकता.
इंस्टाग्रामवर लोकप्रिय भारतीय शेफ आणि फूड रायटर तरला दलाल यांनी वजन कमी करण्यासाठी ही सोपी शाकाहारी प्रोटीन पावडरची रेसिपी शेअर केली आहे.
1. प्रथिने पावडर तयार करण्यासाठी या घटकांची आवश्यकता असेल
यानंतर एका पॅनमध्ये खरबुजाचे दाणे, भोपळ्याचे दाणे, सूर्यफुलाच्या बिया आणि जवसाच्या बिया मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या. त्यांना बाहेर काढा आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी त्याच प्लेटमध्ये ठेवा. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात चिया सीड आणि कोरडे खजूर घालून ब्लेंडरच्या करून बारीक पावडर बनवा.
3. प्रोटीन शेक बनवण्यासाठी प्रोटीन पावडर कशी वापरायची?
एका ग्लासमध्ये एक कप गरम दूध घ्या.
तीन चमचे होममेड प्रोटीन पावडर मिसळा.
गोडपणासाठी तुम्ही त्यात एक ते दोन चमचे मधही घालू शकता.
चांगले शेक करा, तुमचा होममेड प्रोटीन शेक झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.