Biscuit Cake Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Biscuit Cake Recipe : सोपा आणि झटपट बनणारा बिस्किट केक, मुलेही खातील आवडीने; पाहा रेसिपी

How To Make Biscuit Cake : तुम्हालाही मुलांसाठी कमी साहित्यात बनवता येणारा केक बनवायचा असेल तर या बिस्किट केक ट्राय करु शकता. १ तासांच्या आत बनणारा हा केक मुलं देखील चवीने आणि आवडीने खातील. पाहूया रेसिपी

कोमल दामुद्रे

Christmas Cake Recipe :

हल्ली केक हा स्पेशल दिवस, बर्थडे किंवा कोणत्याही आनंदाच्या क्षणी हमखास खाल्ला जातो. कधी कधी आपण हा केक बेकरीसारखा सॉफ्ट बनवण्याचा प्रयत्न करतो पण बरेचदा हवा तसा बनत नाही.

ख्रिसमस म्हटलं की, आपसुकच जिभेवर केकची चव रेंगाळते. जर तुम्हालाही मुलांसाठी कमी साहित्यात बनवता येणारा केक (Cake) बनवायचा असेल तर या बिस्किट केक ट्राय करु शकता. १ तासांच्या आत बनणारा हा केक मुलं देखील चवीने आणि आवडीने खातील. पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • बिस्किट - २ मोठे पॅकेट

  • साखर (Sugar) - २ चमचे

  • काजू - ६

  • दूध - १ ग्लास

  • एनो - १ टीस्पून

  • चॉकलेट

2. कृती

  • बिस्किटांचा केक बनवण्यासाठी तुमच्या आवडीचे कोणतेही बिस्किट घेऊ शकता. बिस्किटांचा व्यवस्थित चुरा करु भांड्यामध्ये ठेवा.

  • भांड्यात १ ग्लास दूध घेऊन बिस्किटांच्या पावडरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स कराल. पीठ चांगले तयार झाल्यावर त्यात किचिंत साखर घाला.

  • त्यानंतर पिठात इनो घाला. इनो ३० सेकंद चांगल्याप्रकारे पिठात मिक्स करुन घ्या. आता पीठ झाकून १५ मिनिटे तसेच ठेवा.

  • दुसऱ्या भांड्याला हलके तेल किंवा बटर लावा. नंतर त्यात पीठ घाला.

  • कुकर किंवा ओव्हनमध्ये तुम्ही केक बनवू शकता. हा केक १० मिनिटांत तयार होईल.

  • केकवर चॉकलेट लावून काजूने सजवा आणि मुलांना खाऊ घाला बिस्किटांचा केक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT