cholesterol control tips saam tv
लाईफस्टाईल

Cholesterol Control Tips: गोळ्या, औषधं घ्यायची गरजच नाही! ५ उपाय करतील कोलेस्ट्रॉल कमी, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

Heart Health: कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान-मद्यपान टाळणे आणि तणावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते जीवनशैलीतील बदलांमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Sakshi Sunil Jadhav

  1. जीवनशैलीतील बदलांमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणणे शक्य आहे.

  2. आहारात फळे, भाज्या, फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असणं आवश्यक आहे.

  3. नियमित व्यायामामुळे शरीरातले चांगले कोलेस्टेरॉल वाढते.

  4. धूम्रपान, मद्यपान व ताणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

सध्याच्या तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचीच जीवशैली फार बदलली आहे. ज्याचा परिणाम थेट त्यांच्या वजनवार होताना दिसतो. शरीरात कोलेस्ट्रोल हा रक्तवाहिन्यांमधून फिरणारा एक प्रकारचा फॅट असून तो शरीरासाठी पेशी एकत्र करण्याचे, हार्मोन्स तयार करण्यास कार्य करत असतो. मात्र याचे प्रमाण जास्त झालं, तर धमन्या बंद होण्याचा धोका वाढतो आणि हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो. पुढे आपण हाच धोका टाळ्याण्यासाठी दैनंदिन आयुष्यात कोणते बदल केले पाहिजेत याबद्दल जाणून घेणार आहोत.

कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारात विभागलं जातं. लो-डेंसिटी लायपोप्रोटीन म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल आणि हाय-डेंसिटी लायपोप्रोटीन म्हणजेच चांगले कोलेस्टेरॉल. एलडीएलचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होतो. पुढे त्याचे रुपांतर ब्लॉकेजमध्ये होऊ शकते. तर एचडीएल हे कोलेस्टेरॉल काढून टाकण्याचे कार्य करत असते.

तज्ज्ञांच्या मते, बहुतेक रुग्णांमध्ये फक्त जीवनशैलीत बदल केल्याने मोठा फरक पडू शकतो. काहींना औषधांची गरज असली तरी सर्वांनाच औषधे घ्यावी लागतात असे नाही. योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि दररोज शरीराला फायदेशीर ठरणाऱ्या सवयी आत्मसात करणे यातून हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी करता येतो.

यासाठी तुम्ही आहारात फळे, भाज्या, डाळी, धान्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. ओट्स, सफरचंद, कडधान्ये आणि काही प्रकारचे सुकेमेवे यामध्ये भरपूर फायबर असते. जे एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. तसेच सॅल्मनसारखी मासळी, ऑलिव्ह तेल, एवोकॅडो यांसारखे गुड फॅट्स फूड फायदेशीर ठरतात. पॅकेज्ड फूड आणि तळलेले पदार्थ टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नियमित व्यायामामुळे एचडीएल म्हणजेच चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढतं आणि एलडीएल कमी होतो. यासाठी दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे, पोहणे किंवा सायकल चालवणे याचा फायदा होतो. व्यायामामुळे वजन नियंत्रित राहते आणि रक्ताभिसरण सुधारते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CIBIL Score: सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स करा फॉलो, कर्ज मिळेल झटक्यात

Bowel Cancer: पोटदुखी, थकवा की आणखी काही... कॅन्सरची नेमकी लक्षणे कोणती? तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Maharashtra Live News Update: करवीर निवासीनी श्री अंबाबाई देवीची श्री तारा माता रूपात पूजा

Nursery Student Heart Attack: नर्सरीतून घरी येताना ५ वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका; बसमध्येच चिमुकलीचा मृत्यू

Madhura Joshi: मराठमोळ्या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढं सर्वजणी फेल

SCROLL FOR NEXT