Reducing Stomach Fat Saam TV
लाईफस्टाईल

Reducing Stomach Fat : वाढलेलं पोट आठवड्यात होईल बारीक; 'या' कोरिअन डाएटने चरबी होईल पातळ

Korean Diet : कोरिअन डाएट करून तुम्ही वाढलेली ढेरी बारीक करू शकता. हे डाएट केल्याने तुमच्या आरोग्यास याचा बराच फायदा होईल.

Ruchika Jadhav

बदलत्या जीवनशैलीमुळे व्यक्ती घरातील सात्विक जेवण खाण्याऐवजी बाहेरील फास्ट फूड खातात. फास्ट फूड खाल्लाने आरोग्याशी संबंधित विविध समस्या उद्भवत आहेत. व्यक्ती दिवसेंदिवस आळशी आणि लठ्ठ होत आहेत. वजन वाढताना काही वाटत नाही. मात्र जाड झाल्यावर पुन्हा बारीक होणं फार कठीण असतं.

काही व्यक्ती लठ्ठपणा वाढल्याने डिप्रेशनमध्ये देखील जातात. कारण वजन वाढल्याने काही आजार जडतात. तसेच व्यक्तीचे वय जास्त असल्यासारखे जाणवते. लठ्ठ व्यक्ती चांगल्या दिसत नाहीत, शिवाय त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका कोरिअन डाएट बद्दल सांगणार आहोत. हे डाएट केल्याने तुम्ही सुद्धा अगदी स्लिम व्हाल.

काय आहे कोरिअन डाएट?

कोरिअन डाएटमध्ये सर्व कोरिअन स्टाइल जेवण खाल्लं जातं. यामध्ये जस्तीत फायबर असलेल्या भाज्या आणि समुद्री जेवणाचा अस्वाद घेतला जातो. हे पदार्थ फक्त वजन कमी करण्यासाठी उपयुक्त नाहीत. तर याचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या सुटतात. तेसच रक्त देखील शुद्ध राहते.

दररोज एक्सरसाइज करणे

कोरिअन डाएट सुरू असताना प्रत्येक व्यक्तीने एक्सरसाइज केली पाहिजे. एक्सरसाइजमध्ये तुम्ही चालणे, धावणे किंवा मग सायकल सुद्धा चालवू शकता. आपलं वजन कमी करण्यासाठी चुकूनही एक दिवस देकील एक्सरसाइज थांबवू नका.

क्रेविंग कंट्रोल करणे

क्रेविंग कंट्रोल करणे हे आपल्या हातात असते. अनेकदा आपल्याला भूक नसते. मात्र तरीही विविध पदार्थांची चव चाखण्याची क्रेविंग होते आणि आपण पोटभर खातो. त्यामुळे काहींना अपचन सुद्धा होते. तसेच असे केल्याने आपलं वजन वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही स्वत: क्रेविंग कंट्रोल करण्यास सुरुवात करा.

हे पदार्थ खाऊ नका

कोरिअन डाएट सुरू असताना काही ठरावीक पदार्थ खाणे बंद करणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही डेअरी प्रोडक्ट आणि साखर असलेले पदार्थ खाऊ शकत नाहीत. दूध, दही, चॉकलेट आणि विविध मिठाई खाल्ल्याने शरीरातील चरबी आणखी वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

SCROLL FOR NEXT