Retirement Plans Saam Tv
लाईफस्टाईल

Retirement Plans : रिटायरमेंट नंतरचे आनंदी आयुष्य कसे जगाल? गुंतवणुकीसाठी सोपे पर्याय

Pension Scheme : वयाच्या 60 नंतर पेन्शनचा लाभ मिळेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Investment Plan : जर तुम्ही निवृत्तीची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी काही गुंतवणूक योजनांची माहिती येथे आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक उत्पन्न मिळेल.

अटल पेन्शन योजना (Scheme) ही एक अशी योजना आहे, जी तुम्हाला दरमहा 1000 ते 5000 रुपये देईल. 18 ते 40 वयोगटातील लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. वयाच्या 60 नंतर पेन्शनचा लाभ मिळेल.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत पोस्ट (Post) ऑफिसमध्ये खाते उघडता येते. यामध्ये 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. किमान मर्यादा 1 हजार रुपये आहे. 60 नंतर तुमचे मासिक उत्पन्न असेल. हे 80C अंतर्गत कर सूट अंतर्गत येते.

पोस्ट ऑफिसच्या (Office) मासिक उत्पन्न योजनेंतर्गतही गुंतवणूक करता येते. या अंतर्गत तुम्ही 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता आणि 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये वार्षिक व्याज 7.4 टक्के आहे आणि पाच वर्षांची मॅच्युरिटी आहे.

नॅशनल पेन्शन योजना अंतर्गत देखील तुम्ही 1000 रुपयांपासून तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता. या अंतर्गत टियर 1 आणि टियर 2 खाती उघडली जातात.

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत विम्याचा लाभ देखील दिला जातो. प्रीमियम अंतर्गत, तुम्हाला विमा (Insurance) आणि गुंतवणुकीचा हप्ता दिला जातो. इक्विटी फंडाच्या आधारे गुंतवणूकदारांना परतावा मिळतो.

जर तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीपूर्वी यमराजांसाठी दिवा कधी आणि कसा लावावा?

Maharashtra Live News Update : नारायणपूरच्या पोलीस अधीक्षकांसमोर १६ माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

Shweta Tiwari: वयाची चाळीशी ओलांडली तरी दिसतेय चिरतरुण; श्वेता तिवारीचं फिटनेस रुटीन काय?

शरीरात 'हे' बदल दिसले तर दुर्लक्ष करू नका; असू शकतात गंभीर आजार

SCROLL FOR NEXT