How To Improve Your Bone Health Saam Tv
लाईफस्टाईल

How To Improve Your Bone Health : 'या' 6 सवयींमुळे हाडे बनतात अधिक ठिसूळ, वेळीच घ्या काळजी

Bones Health : हेल्थमध्ये आपल्या हाडांचे देखील योगदान असते.

कोमल दामुद्रे

Bad Habits : जर तुम्हाला दीर्घकाळ जगायचे असेल तर, तुम्ही तुमच्या शरीराच्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुमचे शरीर तेव्हाच सुदृढ राहील जेव्हा तुम्ही शरीराला व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आणि खनिजे उपलब्ध करून द्याल.

जोपर्यंत आपण हेल्दी लाईफस्टाइल आत्मसात करत नाही. तोपर्यंत आपले शरीर स्वस्थ राहू शकत नाही. अशातच हेल्थमध्ये आपल्या हाडांचे देखील योगदान असते. शरीरामधील हाडे आपल्या शरीराला बॅलेन्समध्ये ठेवण्याचे काम करतात आणि याच मजबुतीवरती आपण चालू आणि पळू शकतो.

अनेकदा आपल्या वाईट सवयींमुळे आपली हाडे कमजोर बनतात. त्यामुळे हाड तुटल्यावरती आणि फ्रॅक्चर झाल्यावरती धोका वाढतो. अयोग्य जीवनशैली आणि अनहेल्दी डाएटमुळे वाईट परीणाम पाहायला मिळतो.

आपल्या डेली रूटीनमधील काही सवयी अंगी लावून घेतो. ज्यामुळे आपल्या हाडांवर त्याचा वाईट परिणाम पाहायला मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशा सवयींबद्दल सांगणार आहोत. ज्या हाडांच्या स्वास्थ्यासाठी अतिशय नुकसानदायक असतात. जर तुमच्यामध्ये सुद्धा या सवयी असतील. तर, तुम्ही लगेचच या सवयी सोडून द्या.

1. कॉफी (Coffee) किंवा चहाचे जास्त प्रमाणात सेवन :

जर तुम्ही सुद्धा जास्त प्रमाणामध्ये चहा आणि कॉफीचे सेवण करत असाल तर तुमची हाडे हळूहळू कमजोर पडू शकतात. चहा आणि कॉफी या दोघांमध्ये कॅफिन उपलब्ध असते. जे शरीराच्या स्वास्थ्य बरोबर हाडांसाठी देखील नुकसानदायक असते.

2. अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन :

दारूचे सेवन हे आपल्या स्वास्थ्यासाठी एखाद्या शत्रूप्रमाणे असते. जर तुम्ही जास्त प्रमाणात दारूचे सेवन करत असाल तर, तुमची हाडे लवकरात लवकर कमजोर बनू शकतात. दारू प्यायल्याने हाड कॅल्शियम शोषण्याची क्षमता सोडून देतात. जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर लवकरात लवकर बंद करा.

3.जास्त प्रमाणात मिठाचे सेवन :

अनेक लोक जेवणामध्ये जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करतात. परंतु अति प्रमाणात मिठाच्या सेवनाने तुमच्या शरीरातील हाडे कमजोर बनू शकतात. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने कॅल्शियम युरीन मार्फत बाहेर निघून जाते आणि तुमची हाडे आणखीन ठिसूळ बनवू लागतात.

How To Improve Your Bone Health

4. सॉफ्ट ड्रिंकचे जास्त प्रमाणात सेवन :

गर्मीच्या दिवसांमध्ये सॉफ्ट ड्रिंकचे जेवण जास्त प्रमाणात केले जाते. काही तर अशी लोक असतात जी थंडीच्या दिवसात देखील सॉफ्ट ड्रिंकचे सेवन करतात. परंतु तुम्हाला माहित आहे का सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने तुमची हाडे कमजोर बनू लागतात.

5. डाएटिंग केल्याने हाड कमजोर होतात :

अनेक लोक असा विचार करतात की, आपण कमी खाल्ल्याने डायटिंग (Diet) तर करू शकतो. त्याचबरोबर आपण वजन कमी करून चांगले फिट राहू शकतो. सगळ्यांनी नेहमीच हेल्थ (Health) एक्स्पर्टच्या सल्ल्यानुसार डायटिंग करावी. जास्त दिवस डायटिंग केल्याने शरीरामधील हाड आणि शरीर दोन्हीही कमजोर पडू लागतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT