How To Improve Poor Mobile Network Saam tv
लाईफस्टाईल

How To Improve Poor Mobile Network : मोबाईलचं नेटवर्क गेलंय? या 5 टिप्स, चुटकीसरशी मिळेल सिग्नल

How To Fix Phone Signal Receiver Not Working : अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यातून तुमची No Signal मधून सहज सुटका होईल

कोमल दामुद्रे

Mobile No Signal Issue : बरेचदा घरात, ऑफिस किंवा बाहेर गेल्यानंतर आपल्याला नेटवर्कची समस्या सतावू लागते. सिग्नल न मिळणे किंवा नेटवर्क थांबणे असे फार क्वचितच होत असते. गरजेच्या वेळी तुमच्या फोनला १ ते २ अशी नेटवर्कची उभी रेषा पाहायला मिळते त्यामुळे फोनही लागत नाही व इतर गोष्टींचा खोळंबा होतो.

अशावेळी आपली चिडचिड होते पण आम्ही आज तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यातून तुमची सहज सुटका होईल. त्याच्या मदतीने तुमची नेटवर्कची समस्या देखील दूर होईल. जाणून घेऊया त्या ५ टिप्स कोणत्या

1 फ्लाइट मोड ऑन करा

फोनला फ्लाइट मोडवर (Flight Mode) ठेवल्याने फोनचे सेल्युलर डेटा नेटवर्क रीस्टार्ट होते. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर नेटवर्क आणि इंटरनेट / कनेक्शन आणि शेअरिंगवर जावे लागेल. तुम्ही फ्लाइट मोड ऑन करू शकाल. काहीवेळा ऑफ केल्यानंतर नेटवर्क (Network) सुरळीत होण्यास मदत होईल

2. फोन रीस्टार्ट करा

बरेचदा फ्लाइट मोड ऑन करुनही मोबाईलला (Mobile) नेटवर्क येत नाही अशावेळी फोन रीस्टार्ट करा. हे फोनच्या सेटिंग्ज देखील पुन्हा रीस्टार्ट करते. काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जातात. यासाठी फोन रीस्टार्ट करा. नेटवर्क पुन्हा पूर्वीसारखे होईल

3. सिम कार्ड काढून बघा

सिम साफ करणे आवश्यक आहे. काहीवेळा जेव्हा फोन रीस्टार्ट करूनही नेटवर्क येत नसेल तर तुमच्या सिममध्ये काही समस्या असू शकतात. अशावेळी तुम्हाला फोनचे सिम काढून मऊ कापडाने स्वच्छ करावे लागेल. यासाठी फोन बंद करु सिम काढा. नंतर कापडाने स्वच्छ करा. मग परत फोन मध्ये ठेवा. यानंतरही नेटवर्क येत नसेल तर तुम्ही सिम बदलण्याची गरज पडू शकते.

4. सॉफ्टवेअर अपडेट

अनेक वेळा सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळेही अशा समस्या उद्भवतात. अशावेळी तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर Software Update/About Phone मधून जो पर्याय उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा. नंतर डाउनलोडवर टॅप करा. मग फोन रीस्टार्ट होईल. असे केल्याने नेटवर्कची समस्या देखील दूर होऊ शकते.

5. नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा

कधीकधी नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करणे आवश्यक होते. यामुळे no signal चा प्रॉब्लेम दूर होते. तुम्ही या सेटिंग्ज रीसेट केल्यावर कोणतीही डेटा हानी होणार नाही. यासाठी सेटिंगमध्ये जा. त्यानंतर सिस्टम/जनरल मॅनेजमेंटमधून जे काही उपलब्ध आहे त्यावर टॅप करा. त्यानंतर रीसेट वर जा आणि WiFi, मोबाइल आणि ब्लूटूथ/रीसेट नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा वर क्लिक करा. त्यानंतर रीसेट सेटिंग्ज वर टॅप करा. हे फोनच्या नेटवर्क सेटिंग्ज रीस्टार्ट करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT