Ghee Purity Verification Saam TV
लाईफस्टाईल

How To Identify Pure Ghee : सणासुदीच्या दिवसात आरोग्याशी खेळ; तुपातील भेसळ कशी ओळखाल? पाहा व्हिडिओ

How To Identify Pure Ghee in Marathi : दुकानदारांकडून सणासुदीच्या दिवसात आरोग्याशी खेळ सुरु झाला आहे. काही दुकानात तुपात भेसळ केली जात आहे. त्यामुळे तुपातील भेसळ ओळखण्यासाठी टिप्स फॉलो करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संदीप चव्हाण, साम टीव्ही मुंबई

मुंबई : तुम्ही चवीचवीनं मिठाई खात असाल तर आजारी पडाल. कारण, तुम्ही खात असलेली मिठाई भेसळयुक्त असू शकते. सणासुदीचे दिवस सुरू आहेत. बाजारात गोडधोडाचे पदार्थ विक्रीला आले आहेत. मात्र, पैसे कमावण्याच्या नादात तुमच्या आरोग्याशी खेळ केला जातोय. मावा, तूप, मिठाईत सर्रास भेसळ केली जातेय.

मावा, तूपात अशी भेसळ होते?

माव्यात निकृष्ट दर्जाची दुधाची पावडर मिसळली जाते.

टॅल्कम पावडर, चुना, खडू, पांढरे रसायनाची भेसळ होते.

नकली मावा बनवण्यासाठी दुधात युरिया, डिटर्जंट पावडर मिसळतात.

निकृष्ट दर्जाचे तूप, शुद्ध तेल, पाणी आणि शुद्ध दूध एकत्र मिसळतात.

बनावट तुपातील साधं वनस्पती तेल, पाम तेल वापरलं जातं.

तूप आकर्षक बनवण्यासाठी कृत्रिम रंग आणि सुगंध टाकला जातो.

अशा प्रकारे बनावट मावा, तूप तयार केला जातो. बनावट मावा बनवण्यासाठी निष्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे ते कमी किंमतीत बनलं जातं. मात्र, निष्कृष्ट दर्जाचं साहित्य वापरून आरोग्याशी खेळ केला जातो. त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.

भेसळयुक्त मिठाई खाण्याचे दुष्परिणाम

नकली तूप खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

लिव्हर खराब होणे, अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास होतो.

महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका वाढतो.

कॅन्सरसारखा गंभीर आजारही होऊ शकतो.

तुपातली भेसळ कशी ओळखायची?

तुपात भेसळ झालीय का हे तुम्ही घरीही ओळखू शकता.

एक चमचा तूप घेऊन ते एका काचेच्या ग्लासमध्ये ओतावे.

तुपात आयोडीनचे एक किंवा दोन थेंब टाका.

तुपात भेसळ असल्यास रंग लगेच बदलतो.

त्यामुळे तुम्ही मावा, तूप बाहेरून आणत असाल तर अशा पद्धतीने तपासून घ्या. सणासुदीचे दिवस सुरू आहेत. तुम्ही मिठाई घरी आणत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण, पैसे कमावण्याच्या नादात तुमच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT