Tips to Get Rid of Yellow Teeth ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Home Remedy :दातांचे पिवळेपण असे दूर करा!

दातांचे पिवळेपण दूर करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या आरोग्याचा महत्त्वपूर्ण अंग म्हणजे आपले दात. आपले अधिकतर आरोग्य (Health) हे आपल्या दातांवर अवलंबून असते. परंतु, आपण दातांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दात दुखी, दातांचे पिवळेपण, दुर्गंधी याकडे वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे. कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा टूथपेस्ट बदलली तरी दातांचा पिवळेपणा जात नाही. तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या असेल तर ही समस्या आणखी वाढू लागते. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आपण अनेक महागडे टुथपेस्ट वापरतो. परंतु, त्यांच्या वापरामुळे दातांच्या वरच्या मजबूत भागाचे नुकसान होऊ शकते.

हे देखील पहा -

दातांचे पिवळेपण दूर करण्यासाठी आपण काही प्रभावी घरगुती (Home) उपाय देखील करू शकतो. जे इतर कोणत्याही टिप्सपेक्षा (Tips) कोणत्याही बाबतीत कमी नाही. दातांचा पिवळसरपणा दूर करण्यास आणि त्यांना पुन्हा चमकण्यास मदत करेल.

१. अशा प्रकारे पावडर तयार करा -

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी हा सोपा उपाय आहे. ही पावडर तयार करण्यासाठी आपल्याला सम प्रमाणात दालचिनी पावडर, लवंग पावडर, काळे मीठ, कडुलिंब आणि पुदिन्याची पाने हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये मिसळून बारीक पावडर बनवा, नंतर दातांवर वापरा. पिवळे दात पुन्हा पांढरे करण्यासाठी हा घरगुती उपाय खूप प्रभावीपणे काम करेल.

२. पावडर कसा वापराल -

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी या पावडरचा वापर मंजनप्रमाणेच करावा. यासाठी टूथब्रशवर ही पावडर घेऊन नेहमीप्रमाणे काही मिनिटे दातांवर हलक्या हाताने चोळा. जर आपण आपल्या बोटाने दातांना मसाज करत असाल तर ते आपल्यासाठी अधिक चांगले होऊ शकते. असे नियमित केल्याने काही दिवसातच फरक दिसेल.

हा उपाय केल्याने आपल्या दातांचे पिवळेपण दूर होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख हा सामान्य माहितीसाठी आहे. कृपया तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT