Gardening Tips : उन्हाळ्यात मनी प्लांटची हिरवाई या पध्दतीने वाढवा

इनडोअर प्लांट्समध्ये मनी प्लांट हा आपल्या घरासाठी खूप फायदेशीर समजला जातो.
Gardening tips in marathi
Gardening tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : उन्हाळ्यात झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो परंतु तो झाडांच्या वाढीसाठी योग्य नसतो. झाडांना सूर्यप्रकाशाची जास्त गरज नसते आणि कमीही. अशावेळी झाडांची (Tree) पाने पिवळे होऊन ते कोरडे पडू लागतात. इनडोअर प्लांट्समध्ये मनी प्लांट हा आपल्या घरासाठी खूप फायदेशीर समजला जातो. भारतातील (India) जवळपास सर्व घरांमध्ये मनी प्लांट सहज सापडेल.

हे देखील पहा -

उन्हाळ्यात मनी प्लांटची योग्य निगा राखणे गरजेचे आहे, अन्यथा त्याची वाढ खुंटते. ऋतूमानानुसार झाडांची निगी राखण्याची पद्धतही बदलते. मनी प्लांट घराच्या आत आणि घराबाहेर लावता येतो. परंतु त्यांची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात मनी प्लांट हिरवागार ठेवण्यासाठी आणि त्याची चांगली वाढ करण्यासाठी काही सोप्या टिप्सचा (Tips) अवलंब केला जाऊ शकतो.

१. मनी प्लांटचे पाणी कधी बदलावे -

मनी प्लांट काचेच्या बाटलीत लावले असेल तर उन्हाळ्यात त्याचे पाणी १० दिवसांच्या अंतराने बदलावे. पाण्यातील क्षार वनस्पती शोषून घेत असते. १० दिवसानंतर पाणी बदलावे, ज्यामुळे झाडाला अधिक पोषण मिळेल. तसेच, जास्त दिवस पाणी साचून राहिल्यास डासांची उत्पत्ती होऊ शकते. पाणी जास्त वेळा बदल्यास झाडाच्या मुळांना नुकसान पोहोचते. जर कुंडीत मनी प्लांट लावत असाल तर भांड्यात पाण्याचीही चांगली व्यवस्था करावी. असे न केल्यास, झाडाची मुळे सडतील किंवा त्यांना बुरशी लागेल.

Gardening tips in marathi
लाल तिखटची भेसळ कशी ओळखाल

२. उन्हाळ्यात मनी प्लांटची वाढ कशी वाढवाल-

उन्हाळ्यात मनी प्लांटची वाढ थांबली असेल आणि ती आपल्याला वाढवायची असल्यास आपण घरातील व्हिटॅमिन-ई आणि सी ची कॅप्सूल कापून त्यातील घटक मनी प्लांटच्या बाटलीत टाकू शकता. भांड्यात मनी प्लांट ठेवला असेल तर ही औषधे आपण मातीत मिसळू शकतो. तसेच कालबाह्य झालेली औषधे देखील मनी प्लांटची वाढ वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतील. ती औषधे मनी प्लांटच्या पाण्यातही टाकू शकतो. ही औषधे खत म्हणून काम करतात. त्यातील पोषक तत्व मनी प्लांटद्वारे शोषले जातात, ज्यामुळे त्याच्या वाढीवर देखील परिणाम होईल.

३. मनी प्लांटची पिवळी पाने अशा प्रकारे करा हिरवी -

स्प्रे बाटली पाण्याने भरुन त्यात एक चमचा खोबरेल तेल घाला. आपण ऑलिव्ह ऑइल, मोहरीचे तेल, बदाम तेल किंवा चमेलीचे तेल देखील घालू शकतो. मनी प्लांटच्या पानांवर तयार मिश्रण स्प्रे करा. यामुळे मनी प्लांटच्या पानांना ताजेपणा आणि चमक येईल. मनी प्लांटची पाने कडक सूर्यप्रकाशामुळे पिवळी पडत असतील तर या पाण्याच्या मिश्रणाने ती हिरवी होईल. हे पाणी शिंपडल्याने पाने आठवडाभर चमकतात. ही प्रक्रिया पुन्हा काही दिवसांनी करू शकतो. पाने सुकली असतील तर ती काढून टाका, लवकरच त्या ठिकाणी नवीन पाने येतील. यासोबतच मनी प्लांट कुंडीत लावला असेल तर त्यां मातीत थोडे पोटॅशियम मिसळावे. असे केल्याने पानांचा पिवळसरपणा दूर होऊन ते पुन्हा हिरवे होण्यास मदत होईल.

अशाप्रकारे आपण उन्हाळ्यात मनी प्लांटची काळजी घेऊ शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com