लाल तिखटची भेसळ कशी ओळखाल

लाल मिरची पावडरमध्ये अनेकदा विटांचा भुसा आणि कृत्रिम रंग यांसारख्या गोष्टी मिसळल्या जातात.
Red chili powder in marathi
Red chili powder in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी लाल मिरची पावडर जवळजवळ वापरली जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी लाल मिरची पावडर महत्त्वाची ठरते. परंतु, घरी बनवलेल्या लाल तिखट आणि बाजारातून आणलेल्या तिखटमध्ये भरपूर प्रमाणात फरक असतो.

उन्हाळा म्हटलं की, प्रत्येक गृहिणीचा कल हा वर्षभर टिकून राहणाऱ्या पदार्थांकडे असतो. त्यातला महत्त्वपूर्ण घटक म्हणजे लाल तिखट. घरच्या घरी लाल तिखट बनवताना आपण त्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाची (Food) खात्री करून घेतो. परंतु, बाजारातून आणलेल्या लाल तिखटाची शुद्धता कधीही तपासत नाही. लाल मिरची पावडरमध्ये अनेकदा विटांचा भुसा आणि कृत्रिम रंग यांसारख्या गोष्टी मिसळल्या जातात. आपल्या आरोग्यासाठी भेसळ नसलेली लाल तिखट वापरणे महत्त्वाचे आहे. पण ही तिखट खरी आणि खोटी हे कसे ओळखायचे? यासाठी तुम्ही या टिप्स (Tips) फॉलो करू शकता.

हे देखील पहा -

वीट पावडरची भेसळ कशी ओळखावी

लाल तिखटमध्ये अनेकवेळा विटांची पावडर मिसळल्याचे दिसून येते. मिसळण्यास सोपे असल्यामुळे ते अगदी सहज करता येते. त्यामुळे आपल्याला ती लाल तिखटसारखी दिसते. बाजारातून आणलेली लाल तिखट तपासण्यासाठी आपण एक काचेचा ग्लास घेऊन त्याखाली थोडी तिखट ठेवा. आता त्या काचेतून पावडर हळूहळू बारीक करा. पावडर बारीक करताना किरकिरी वाटत असेल तर त्या तिखटात विटांची पावडर मिसळली आहे हे समजेल.

Red chili powder in marathi
सायकलीचा गंज काढण्यासाठी फॉलो करा या टिप्स

लाल रंगाची भेसळ कशी शोधायची

बऱ्याचदा रश्याला रंग येण्यासाठी आपण कलरवाला लाल तिखट पावडर विकत घेतो. परंतु या लाल तिखटात अनेक वेळा कृत्रिम रंगही मिसळला जातो. त्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. रंगातील भेसळ तपासण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात (Water) एक चमचा लाल तिखट घेऊन ते पाण्यात चांगले मिसळा. मिरची पावडर पाण्यात विरघळली आणि पाण्याचा रंग गडद लाल झाला, तर त्यात रंग भेसळ झाल्याचे समजते. लक्षात ठेवा मिरची पाण्यात कधीच विरघळत नाही तर तरंगते.

अशा प्रकारे स्टार्च भेसळ तपासा

लाल तिखटात स्टार्च टाकल्याचीही चर्चा आपण बऱ्याचदा ऐकली असेल. आपण वापरत असलेल्या मिरची पावडरमध्ये स्टार्च आहे की नाही हे ओळखण्यासाठी अर्धा चमचा तिखट घ्या. त्यात टिंचर आयोडीनचे काही थेंब घाला. पावडरचा रंग निळा झाल्यास पावडरमध्ये स्टार्चची भेसळ झाली आहे हे आपल्याला कळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com