DIWALI Pooja, Lakshmi ganesh pooja vidhi saam tv
लाईफस्टाईल

Diwali Puja: दिवाळीला लक्ष्मी-गणपतीची पुजा कशी कराल? पुजेच्या साहित्याची यादी आताच लिहून घ्या!

DIWALI Pooja, Lakshmi ganesh pooja vidhi : यंदा दिवाळी 2 दिवस साजरी करण्यात येणार आहे. आजच्या दिवशी दिवाळी साजरी करणाऱ्या व्यक्तींनी पुजा कशी करावी हे जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीला सुरूवात झाली असून हा दिव्यांचा सणा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी भगवान गणेश, देवी लक्ष्मी आणि कुबेर जी यांची पूजा करण्यात येते. जाते. यंदा दिवाळी 2 दिवस साजरी करण्यात येणार आहे. आजच्या दिवशी दिवाळी साजरी करणाऱ्या व्यक्तींनी पुजा कशी करावी हे जाणून घेऊया.

कसे लावावे दिवे?

यंदाची दिवाळी ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने देखील महत्त्वाची आहे. यावेळी दिवाळीत चार योग तयार होतायत. एकाच वेळी चार ग्रह आपापल्या राशीमध्ये असणे हा एक दुर्मिळ योगायोग आहे. आजच्या दिवशी पूजा केल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर गहू ठेवून त्यावर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावला पाहिजे.

आजच्या दिवशी विधीवत पूजा कशी करावी?

  • दिवाळीत प्रदोष काल किंवा संध्या पूजनाचे विशेष महत्त्व मानलं जातं. यावेळी बहुतेक लोक दिवाळीची पूजा करतात. ही पुजा कशी करावी ते पाहूयात-

  • संध्याकाळी स्वच्छ अंघोळ करून पहिल्यांदा संपूर्ण घरात गंगाजल शिंपडलं पाहिजे.

  • आता एक लाकडी स्टूल सेट करा आणि त्यावर नवीन लाल किंवा पिवळं कापड ठेवा.

  • मूठभर तांदूळ किंवा धान्यावर कलश ठेवा. कलशात पवित्र पाणी, फुलं, एक सुपारी, अक्षत, वेलची आणि चांदीचे नाणं ठेवा.

  • आंब्याच्या पाच पानांनी कलेशचा चेहरा झाका. यानंतर पोस्टावर माता लक्ष्मी आणि गणेशजींच्या नवीन मूर्ती स्थापित करा.

  • भगवंताचा जलाभिषेक करून मग त्यांना गंगाजल आणि पंचामृताने स्नान घालावं. पुन्हा पवित्र पाण्याने जलाभिषेक करावा. मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून स्थापित करावी.

  • आता गणपतीला पिवळ्या चंदनाचा तिलक आणि लक्ष्मीला लाल चंदन किंवा कुंकवाचा टिळा लावा. त्याचप्रमाणे कलशावरही तिलक लावा.

  • आता फळं, सुपारी, फुले, मिठाई, वेलची, अखंड, नारळ आणि सुपारी देवाला अर्पण करा.

  • गणपती बाप्पाला पिवळ्या फुलांची माळ आणि देवी लक्ष्मीला कमळाच्या फुलांची माळ अर्पण करा.

  • अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावा.

  • गणपतीला लाडू आणि देवी लक्ष्मीला खीर किंवा पांढरी मिठाई अर्पण करा. प्रथम पूर्ण भक्तिभावाने श्री गणेशाची आरती करा आणि नंतर माता लक्ष्मी आणि कुबेरजींची आरती करा.

पुजेचं साहित्य

लक्ष्मी आणि गणेशजींची मूर्ती, सरस्वतीजींची मूर्ती, कमळ आणि गुलाबाची फुले, सुपारी, केशर, तांदूळ, सुपारी, फळं, मिठाई, फुलं, दूध, गंगाजल, अत्तर, बत्ताशे, सुका मेवा, मध, दही, दिवा, कापूस, कलावा, पाण्यासह नारळ, तांब्याचा कलश, स्टील किंवा चांदीचा कलश, चांदीचे नाणं, पीठ, तेल, लवंगा, लाल किंवा पिवळे कापड, तूप, एक ताट.

डिस्क्लेमर- आम्ही असा दावा करत नाही की या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT