Vaginal infection monsoon cure saam tv
लाईफस्टाईल

Women Health: पावसाळ्यामध्ये योनीमार्गाचा संसर्ग झाल्यास कसा बरा करावा? तज्ज्ञांनी महिलांना दिल्या महत्त्वाच्या टीप्स

Vaginal infection monsoon cure: पावसाळ्यात वाढणारी आर्द्रता आणि ओलसरपणा वजानल इन्फेक्शन म्हणजेच योनीमार्गाच्या संसर्गास कारणीभूत ठरते. या दिवसांमध्ये सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी कसं राहायचं याबाबत काही टिप्स या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्यात उष्णतेपासून आराम मिळतो. परंतु त्यामुळे संसर्गाचा धोका देखील वाढतो. विशेषतः महिलावर्गास याचा धोका अधिक असतो. हे सर्वज्ञात आहे की या ऋतूत वाढलेली आर्द्रता, वातावरणातील बदल आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे योनीमार्गाच्या इन्फेक्शनची समस्या उद्भवते.

त्याचप्रमाणे या हवामानात ओली अंतर्वस्त्रं, घट्ट कपडे घालणं आणि ओल्या कपड्यांमध्ये बराच वेळ वावरणं यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होऊन संसर्गाचा धोका वाढतो. पावसाळ्यात असलेल्या मर्यादित सूर्यप्रकाशामुळेही संसर्गाचा धोका वाढतो.

योनीमार्गाच्या संसर्गाचे प्रकार

यीस्ट इन्फेक्शन : जास्त आर्द्रतेमुळे बुरशीच्या वाढीमुळे होते.

वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन : जेव्हा योनीमार्गातील बॅक्टेरियांचं नैसर्गिक संतुलन बिघडते तेव्हा हा संसर्ग उद्भवतो.

ट्रायकोमोनियासिस : लैंगिक संक्रमित संसर्ग आहे जो 'ट्रायकोमोनास योनिनालिस' या परजीवीमुळे होतो.

या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

  • योनीमार्गाभोवती खाज सुटणे किंवा जळजळ होणे

  • योनीमार्गातील असामान्य स्त्राव

  • लघवी करताना किंवा संभोग करताना होणाऱ्या वेदना

  • सतत लघवी करण्याची इच्छा होणे

  • लालसरपणा किंवा सूज

वेळीच उपचार न केल्यास होणारी गुंतागुंत

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गुप्ते यांन सांगितलं की, जर वेळीच उपचार केले नाहीत तर, योनीमार्गाच्या संसर्गामुळे ओटीपोटात वेदना होऊ शकतात, मूत्रमार्गात संसर्ग पसरू शकतो, वारंवार संसर्ग होऊ शकतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. गर्भवती महिलांना प्रगत संसर्ग झाल्यास मुदतपूर्व प्रसूतीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

वजायनल इन्फेक्शन झाल्यास काय उपाय कराल?

  • पावसात भिजल्यानंतर लगेच ओले कपडे बदला.

  • कापसासारख्या श्वास घेण्यायोग्य कापडापासून बनवलेले कपडे वापरा.

  • योनीमार्गाचे पाण्याने स्वच्छ धुवा, सुगंधित साबणाने किंवा रासायनिक उत्पादनांनी योनीमार्गाची

  • स्वच्छता करणे टाळा. तज्ञांनी शिफारस केलेल्या उत्पादनांचाच वापर करा.

  • विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड रहा.

  • घट्ट कपडे वापरणे टाळा आणि घाम येणे आणि ओलावा जमा होऊ नये म्हणून सैल, कोरडे आणि

  • सुती कपड्यांची निवड करा. शौचालयाचा वापर केल्यानंतर स्वच्छतेचे पालन करा, जेणेकरून बॅक्टेरिया पसरणार नाही. मासिक पाळीच्या दरम्यान दर ४ ते ६ तासांनी सॅनिटरी पॅड बदला.

महिलांनो, पावसाळ्यात संसर्गमुक्त राहण्यास या महत्त्वाच्या टिप्सचा वापर करा. जर तुम्हाला काही असामान्य लक्षणे आढळून आली तर वेळीच निदान आणि व्यवस्थापनासाठी तज्ञांचा सल्ला घ्या. या पावसाळ्यात तुमच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास विसरू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT