How To Cook Perfect Rice Yandex
लाईफस्टाईल

How To Cook Perfect Rice: पोटभर भात खा, तरीही वजन वाढणार नाही; जाणून घ्या भात बनवण्याची नवी पद्धत

Vishal Gangurde

Health Tips: वजन कमी करण्यासाठी अनेक जण भात खाणं सोडतात. तर काही जण दिवसातून एकदाच भात खातात. भात हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा आहार आहे. त्यामुळे देशभरातील अनेकांच्या ताटात भात असतोच. हाच भात एका विशिष्ट पद्धतीने बनवल्यास वजन वाढणार नसल्याचे आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

भात खाल्याने अनेकांना वाटतं की, वजन वाढतं. त्यामुळे अनेक जण त्यांच्या नेहमीच्या आहारात भाताचं प्रमाण कमी करतात. अनेक जणांकडून भाताचा संबंध लठ्ठपणाशी जोडल्याने त्यांच्याकडून आहारात भाताचं प्रमाण कमी केलं जातं. मात्र, तांदूळ हा आहाराचा एक अत्यावश्यक भाग आहे.

अन्न कसं शिजवलं जातं आणि किती प्रमाणात खाल्लं जातं, यावरून वजन वाढतं. भात बनवताना त्यात जास्त प्रमाणात तेल किंवा तूप टाकल्याने कॅलरीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अशा पद्धतीने बनवलेला भात खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. ( Know How To Cook Perfect Rice In Marathi)

तसेच भात इतर भाज्यांसोबत अधिक प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. दररोज तूप, तेल, लोणी यांसारख्या पदार्थांसोबत भात खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे भात उकळून आणि भाज्यांसोबत खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

तत्पूर्वी, डॉ. विलास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकरमधील भात पचायला जड असतो. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर भात बनवताना तांदूळ जुना वापरा. तांदूळ हा तेल किंवा तुपात तव्यावर व्यवस्थित भाजून घ्या'.

'गॅस किंवा चुलीवर भात बनविण्यासाठी घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवू नका. भात व्यवस्थित शिजल्यानंतर त्यातील पेज फेकून द्या, अशा पद्धतीने भात बनविल्यास वजन वाढणार नाही, असे ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT