Juice For Diabetes Saam Tv
लाईफस्टाईल

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी या ४ ज्यूसचे करा नियमित सेवन, कंट्रोलमध्ये राहिल ब्लड शुगर

Diabetes Symptoms : हल्ली मधुमेहाच्या आजाराने हल्ली सगळ्या वयोगटातील तरुण त्रस्त आहेत. भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून आली. या काळात खाण्यापिण्याच्या सवयींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

कोमल दामुद्रे

How To Control Blood Sugar :

हल्ली मधुमेहाच्या आजाराने हल्ली सगळ्या वयोगटातील तरुण त्रस्त आहेत. भारतात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून आली. या काळात खाण्यापिण्याच्या सवयींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची (Sugar) पातळी वारंवार वाढत असेल तर आहारात (Diet) बदल करायला हवा. जर आपण काही गोष्टींची वेळीच काळजी घेतली तर रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते.

1. पालक रस

पालकमध्ये जीवनसत्त्वे आणि अमीनो ऍसिडसह अनेक घटक आहेत. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात आढळतात. याचा ज्यूस प्यायल्याने टाईप २ मधुमेहाचा (Diabetes) धोका कमी होतो.

2. कारल्याचा रस

कारल्याचा रस आणि पाणी रक्तातील साखेरची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी चांगले आहे. यात इन्सुलिन सारखा घटक पॉलीपेप्टाइड पी आढळतो. जो मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

3. दुधीभोपळा

दुधीभोपळ्यामध्ये फायबर असते ज्यात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. यात असणारे कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेहाच्या आजारावर काही प्रमाणात मात करता येईल. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहिल.

4. कोरफड

कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई, सी आणि अनेक आवश्यक अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रिणत ठेवण्यासाठी आपण कोरफडचा रस पिऊ शकतो. याचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदा होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT