Yoga To Reduce Belly Fat Saam tv
लाईफस्टाईल

Yoga For Belly Fat: डबल चिन आणि सुटलेल्या पोटामुळे त्रस्त आहात? नियमित करा हा योगा, महिन्याभरात दिसेल फरक

कोमल दामुद्रे

How To Reduce Belly Fat:

नवीन वर्ष सुरु झाले की, आरोग्याच्या बाबतीत अनेकजण सक्रिय होतात. नवे संकल्प देखील करतात. अशातच मागच्या वर्षभरात वाढत्या वजनामुळे अनेकजण त्रस्त झालेले पाहायला मिळाले.

लठ्ठपणा किंवा वाढते वजन ही समस्या आजकाल सर्वसामान्य झाली आहे. स्त्री असो किंवा पुरुष आता लहान मुलेही याचे बळी पडत आहे. सतत वाढणाऱ्या लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, हृदय यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. यामुळे विविध आजार आणि अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

जर तुम्हालाही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल आणि डबल चिनमुळे त्रस्त असाल तर काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला आम्ही एक योगासन सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही पोटाची चरबी सहज कमी करु शकता. जाणून घेऊया त्याबद्दल

उस्त्रासन

उस्त्रासनला कॅमल पोज असेही म्हटले जाते. या योगमुळे (Yoga) शरीराला फायदे होतात. उस्त्रासनला केल्याने शरीर लवचिक होण्यास मदत होते. यामुळे शरीराचे तीन भाग म्हणजे खांदे, छाती आणि कंबर खूप मजबूत होते, शरीर लवचिक बनते. पाठदुखीची समस्या कमी होते. यामुळे थकवा आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो.

पचन सुधारण्यासाठी हा योगा उत्तम मानला जातो. या आसनाचा सराव करताना ओटीपोटीला देखील अनेक फायदे होतात. अपचन, बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्या दूर होण्यास मदत होते.

फुफ्फुसाची क्षमता सुधारण्यासाठी उस्त्रासन हा एक उत्तम योगासन आहे. हे आसन रोज केल्यास फुफ्फुसाची क्षमता वाढण्यास आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत होईल. दमा आणि इतर श्वसन समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे.

तणाव (Stress) आणि चिंता कमी करण्यासाठी उस्त्रासन एक उत्तम योगासन आहे. यामुळे मन शांत राहाते. तसेच यामुळे नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्याच्या (Mental Health) समस्या दूर करण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT