Calcium Deficiency : हाडे ठिसूळ झालीये, दातांचे दुखणेही वाढले? असू शकते कॅल्शियमची कमतरता, ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा

Calcium Deficiency Disease : शरीराला निरोगी राहाण्यासाठी अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. हे पोषक घटक तुमच्या शरीराच्या सर्वांगीण आणि योग्य विकासासाठी मदत करतात. कॅल्शियम हे या पोषक तत्वांपैकी एक आहे जे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
Calcium Deficiency
Calcium DeficiencySaam tv
Published On

Calcium Deficiency Symptoms :

शरीराला निरोगी राहाण्यासाठी अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. हे पोषक घटक तुमच्या शरीराच्या सर्वांगीण आणि योग्य विकासासाठी मदत करतात. कॅल्शियम हे या पोषक तत्वांपैकी एक आहे जे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

हिवाळा सुरु झाला की, हाडे दुखी आणि दाताचे दुखणे सुरु होते. अशावेळी नेमके काय करावे हे आपल्या सुचत नाही. जेव्हा ही समस्या अचानक उद्भवते तेव्हा साधरणत: समजून घ्यावे की, शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली आहे.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी याची कमतरता ओळखणे गरजेचे आहे. शरीरात कॅल्शियमच्या कमरतेमुळे दिसणाऱ्या लक्षणांकडे (Symptoms) दुर्लक्ष करु नका. ही लक्षणे कोणती जाणून घेऊया

1. स्नायू दुखणे

अचानक स्नायू दुखू लागले की कॅल्शियमची कमरता आहे हे समजून घ्यावे. यामुळे पाय, पाठ आणि हात दुखू लागतात. अशावेळी डॉक्टरांचा (Doctors) सल्ला घ्यावा

Calcium Deficiency
Diabetes रुग्णांनो 2024 च्या सुरुवातीला लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल, राहाल फिट

2. दात किडणे

दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम (calcium deficiency) अधिक आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात.

3. ऑस्टिओपोरोसिस

शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास कमतरतेमुळे हाडे कमकुवत आणि ठिसूळ होऊ शकतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतात.

4. मुलांची वाढ खुंटते

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्यांची वाढ आणि विकास विलंब होऊ शकतो. कारण चांगल्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियम आवश्यक आहे.

Calcium Deficiency
थांबा! तुम्हालाही Red Wine आरोग्यासाठी फायदेशीर वाटते? संशोधन काय सांगते जाणून घ्या

5. हातापायांना मुंग्या येणे

अनेकदा हात, पाय, बोटे आणि चेहऱ्यावर सुन्नपणा आणि मुंग्या जाणवत असेल तर कॅल्शियमची कमतरता आहे असे समजून घ्यावे. यासाठी आहारात बदल करावा. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com