Life Insurance  Saam Tv
लाईफस्टाईल

Life Insurance Buying Guide: योग्य जीवन विमा कसा निवडाल ? योजना निवडताना या गोष्टींकडे दुर्लक्ष नकोच !

Best Life Insurance Plan For Family : संकटकाळात आपल्या कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण विमा काढतात.

कोमल दामुद्रे

Best Life Insurance Plan : संकटकाळात आपल्या कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण विमा काढतात. त्यात मिळणारा रिटर्नस व प्रीमियम किती असायला हवा हे देखील पाहातात.

भारतात सध्या विमा घेण्याचे प्रमाण वाढले असले तरी इतर देशांच्या तुलनेत हे कमीच आहे. जीवन विमा अर्थात लाइफ इन्शुरन्स घेताना अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. काहीना ऑफिस किंवा इतर ओळखीच्या ठिकाणांवरुन विमा काढण्याचा सल्ला दिला जातो.

विमा (Insurance) खरेदी करणे हा एक अतिशय फायदेशीर आहे. जर चांगला आयुर्विमा खरेदी केला तर त्यातून येणार्‍या काळात चांगला परतावा मिळू शकतो आणि आयुष्य संपले तर कुटुंबालाही आर्थिक मदतीच्या रूपाने जीवन विमाचा लाभ मिळतो. अशा परिस्थितीत आयुर्विमा खरेदी (Shop) करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

1. जीवनाचा चांगला टप्पा -

जीवन (Life) विमा निवडताना तुमच्या गरजा नेहमी लक्षात ठेवा. वयाची काळजी असेल तर तुम्हाला तो वयानुसार प्रीमियम आणि मॅच्युरिटीची रक्कम बदलू शकता. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या आर्थिक जबाबदाऱ्या असतात. जर तुम्ही तुमच्या कुटुंबाचे एकमेव कमावते असाल, तर ते तुमच्या दीर्घकाळ अवलंबून राहू शकतात. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला कोणता जीवन विमा निवडणे आवश्यक आहे याचा विचार करा.

2. मूल्यांकन करा-

तुमच्या दैनंदिन गरजांवर आधारिक जीवन विमा कसा निवडाल हे समजून घ्या. खर्च करण्याच्या या सवयी व सामान्य राहाणीमानाचा समावेश करा. लाइफ इन्शुरन्समधून तुमचे आयुष्य सुरक्षित करा. यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींना आर्थिकबाबीने फायदा होईल.

3. उत्पन्नाचे विश्लेषण करा-

तुम्ही एका वर्षात किती प्रीमियम जमा करु शकता हे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार आयुर्विम्याचा प्रीमियम निवडावा. लाइफ इन्शुरन्सचा प्रीमियम जितका जास्त असेल तितका चांगला परतावा मिळतो हे लक्षात ठेवा. जर तुमचे उत्पन्न प्रीमियमची रक्कम पूर्ण करू शकत नसेल, तर तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीवर जास्त भार टाकू नका. तुमच्या उत्पन्नानुसार प्रीमियम निवडा.

4. प्लान -

अनेक लोकांना विमा कसा निवडायचा? त्याचे फायदे कसे आहेत याबाबत माहीत नसते. त्यामुळे रायडर्स ही विमा पॉलिसीचे कव्हरेज वाढविण्यासाठी विमा कंपन्यांद्वारे प्रदान केली जाते. विमा खरेदी करताना अतिरिक्त प्रीमियम भरून ते तुमच्या विमा पॉलिसीशी जोडले जाऊ शकतात.

5. विमा कंपनीचे क्लेम सेटलमेंट तपासा-

तुम्ही ज्या कंपनीकडून विमा खरेदी करत आहात त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो तपासा. यामुळे गरजेच्या वेळी आर्थिक मदत मिळण्याची हमी मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT