प्रदूषण आणि धुळीचा आपल्या चेहऱ्यावर अधिक परिणाम होतो. सुंदर दिसण्यासाठी आपण रोज काही ना काही करत असतो. वाढते प्रदूषण, चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर परिणाम होतो.
वयाची ३० शी ओलांडल्यानंतर तुमचे केस आणि चेहऱ्यावरुन तुमच्या वयाचा अंदाज लावला जातो. वाढत्या वयाबरोबरच त्वचेची लवचिकता कमी होते. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. जर तुम्ही त्वचेच्या बाबतीत निष्काळजीपणा केला तर लवकरच म्हातारे दिसू लागाल त्यामुळे तरुण दिसायचे असेल तर या ५ गोष्टींनी तुमचा ब्युटी रुटीनचा भाग बनवा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. मेकअप रिमूव्हर बाम
मेकअप केल्यानंतर तो काढण्यासाठी गुलाबपाणी आणि खोबरेल तेलाने चेहरा स्वच्छ करा, यासाठी मेकअप रिमूव्हर बाम सोयीस्कर ठरेल. हे वापरण्यासाठी तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावर रिमूव्हर बाम लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
2. शीट मास्क
जर तुमची त्वचा (Skin) सतत कोरडी किंवा निर्जीव दिसत असेल तर शीट मास्क लावा. यामुळे त्वचेला आतून पोषण मिळेल. वापरताना चेहरा फेसवॉशने (Facewash) धुवा. शीट मास्क लावून २० मिनिटे ठेवा. काढल्यानंतर चेहऱ्यावर पसरलेल्या सीरमने मसाज करा. चेहरा कोरडा झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावा.
3. फेस सीरम
फेस सीरम लावणे चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर (Benefits) ठरते. चेहरा साफ करण्यासाठी आणि टोनिंगसाठी काही मिनिटे सीरम लावा. सीरमचे काही थेंब चेहऱ्यावर लावल्यानंतर ५ मिनिटांनी मॉइश्चरायइर लावा.
4. नाईट क्रीम
तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नाईट क्रीमचा समावेश करा. नाईट क्रीमचे दोन थेंब बोटांवर घेऊन व्यवस्थित पसरवा. ज्यामुळे त्वचेला अधिक फायदा होईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.