Anxiety Triggers Saam Tv
लाईफस्टाईल

Anxiety Triggers : तुम्हालाही सतत एन्जायटी होते? असू शकते हे कारण, वेळीच घ्या काळजी

What Causes Anxiety In The Brain : बरेचदा काहीही कारण नसताना आपल्याला चिंता वाटू लागते. त्यामुळे आपल्याला नैराश्य येते. या वेळी अचानक आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. श्वासोच्छवास अधिक जलद होतो. घाम येतो आणि रक्तदाब वाढतो.

कोमल दामुद्रे

Increased Anxiety Symptoms :

बरेचदा काहीही कारण नसताना आपल्याला चिंता वाटू लागते. त्यामुळे आपल्याला नैराश्य येते. या वेळी अचानक आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. श्वासोच्छवास अधिक जलद होतो. घाम येतो आणि रक्तदाब वाढतो.

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य जपणे अंत्यत आवश्यक आहे. बदलेल्या जीवनशैलीनुसार आपण कामामुळे अधिक व्यस्त झालो आहोत. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देतो परंतु, मानसिक आरोग्याकडे (Health) अधिक दुर्लक्ष केले जाते. चिंता एक प्रकारचा आजार मानला जातो. यावर औषधोपचार करुन बरा करता येतो. पण अतिरिक्त ताण (Stress) कसा येतो. याचे कारण काय? लक्षणे (Symptoms) कोणती? जाणून घेऊया.

1. जेवण स्किप करणे

मेंदूला काम करण्यासाठी ग्लुकोजची सगळ्यात जास्त आवश्यक असते. हे ग्लुकोज शरीराला पुरेसे प्रमाणात मिळाले नाही तर ते व्यवस्थित रित्या काम करु शकणार नाही. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखर कमी होऊ लागते ज्यामुळे थकवा आणि चिंतेचे सामना करावा लागतो. अशावेळी जेवण स्किप करणे हानिकारक आहे.

2. प्रोसेस्ड फूड

पॅकबंद आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्यासाठी आणि चविष्ट असले तरी त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. साखर, चरबी आणि मीठ मिसळलेले असते. ज्यामुळे प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते. तणाव आल्यावर आपण असे पदार्थ खातो ज्यामुळे आपले वजन वाढू लागते.

3. मद्यपान

मेंदूमध्ये GABA नावाचे रसायन आढळते, जे मेंदूला आराम देते. सतत ताण येऊ लागल्यावर अनेकजण मद्यपान करतात. ज्यामुळे त्यांना रिलॅक्स वाटते. त्यानंतर मेंदूतील GABA चे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे अधिकचा ताण येऊ लागतो.

4. पुरेशी झोप न घेणे

अनेकदा स्क्रिन टाइम, मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे पुरेशा प्रमाणात झोप घेता येत नाही. ज्यामुळे अनेकांच्या झोपेची पद्धत बिघडली आहे. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. तसेच ताण देखील येतो. त्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

SCROLL FOR NEXT