Workplace Anxiety: कामाच्या अतिव्यापामुळे येऊ शकते वर्कप्लेस एन्जायटी, कसे डील कराल ही Situation

Workplace Anxiety Causes: ऑफिसमध्ये फक्त कामाचा विचार होत नाही तर इतर अनेक गोष्टींचा विचार देखील केला जातो. जसे घराचे वातावरण हसते खेळते असले की, घर आनंदी असते. तसेच ऑफिसच्या बाबतीतही असते.
Workplace Anxiety Causes: How To Deal with situation mental and physical stress
Workplace Anxiety Causes: How To Deal with situation mental and physical stressSaam Tv
Published On

Workplace Anxiety Control Tips:

ऑफिसमध्ये फक्त कामाचा विचार होत नाही तर इतर अनेक गोष्टींचा विचार देखील केला जातो. जसे घराचे वातावरण हसते खेळते असले की, घर आनंदी असते. तसेच ऑफिसच्या बाबतीतही असते.

ऑफिसमध्ये (Office) बरेचदा तुमच्या सहकाऱ्याची वागणूक, बॉसची वागणूक आणि कामाच्या अतिरिक्त ताणामुळे (Stress) तुमच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम पाहायला मिळतो. कामाच्या टेन्शनमुळे अनेकवेळा तुम्हाला ऑफिसमध्ये अचानक स्ट्रेस येतो. याला वर्कप्लेस एन्जायटी असे म्हटले जाते. यामुळे तुमच्या आरोग्यावर (Health) त्याचा परिणाम होतो. ज्याला सामोरे जाणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही या गोष्टींचा त्रास होत असेल तर या टिप्स लक्षात ठेवा.

1. श्वास घ्या

कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक स्ट्रेस येत असेल तर पुसेसा श्वास घ्या. थोड्यावेळ विश्रांती घ्या. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला बरे वाटेल.

Workplace Anxiety Causes: How To Deal with situation mental and physical stress
Heart Attack रोखण्यासाठी ही ५ योगासने ठरतील बेस्ट! मानसिक स्वास्थ्य ही राहिल तंदुरुस्त

2. ट्रिगर ओळखा

कामात आपण इतके व्यस्त असतो की, अचानक चिंता वाटू लागते. यासाठी तुमचा ट्रिगर ओळखणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी होणऱ्या त्रासामुळे तुम्हाला अधिक स्ट्रेस येऊ शकतो.

3. ब्रेक घ्या

कामाच्या दरम्यान जास्त ताण आल्यामुळे चिंतेची समस्या उद्भवते. अशावेळी लहान ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे मन शांत राहील. आणि तुम्ही कामावर अधिक चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रित करु शकाल.

Workplace Anxiety Causes: How To Deal with situation mental and physical stress
Stress Management : सतत ताण घेण्याची सवय पडू शकते महागात? कसे कराल यावर मात?

4. कामाची पद्धत

कामाच्या ठिकाणी आपल्याला अधिकची जबाबदारी दिली की, ताण येतो. अशावेळी कामाचे नियोजन नीट करा. यामुळे तुम्हाला मानसिक ताण येणार नाही.

5. जीवनाचा आनंद घ्या

कामाव्यतिरिक्त तुम्ही स्वत:ला वेळ द्या. मित्रांना भेटा, फिरायला जा, कुटुंबासोबत वेळ घालवा. यामुळे कामाच्या ताणापासून थोडे लांब जाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com