Mental Health
Mental HealthSaam Tv

Mental Health : मानिसक तणावातून सुटका होईलच! या ४ गोष्टी कायम लक्षात ठेवा

Mental Health Tips : शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य जपणे अंत्यत आवश्यक आहे. बदलेल्या जीवनशैलीनुसार आपण कामामुळे अधिक व्यस्त झालो आहोत. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देतो परंतु, मानसिक आरोग्याकडे अधिक दुर्लक्ष केले जाते.
Published on

How To Care Mental Health :

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य जपणे अंत्यत आवश्यक आहे. बदलेल्या जीवनशैलीनुसार आपण कामामुळे अधिक व्यस्त झालो आहोत. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देतो परंतु, मानसिक आरोग्याकडे अधिक दुर्लक्ष केले जाते.

खरेतर शरीर जितके उत्तम असते तितकेच उत्तम मानसिक आरोग्य (Mental Health) असायला हवे. सध्या अनेक तरुण हे मानसिक आजाराने (Disease) त्रस्त आहेत. सततचा ताण (Stress), चिंता, अपुरी झोप, नैराश्य यामुळे अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही देखील सततच्या मानसिक त्रासाला वैतागले असाल तर या ४ गोष्टी कायम लक्षात ठेवा.

1. दिनचर्या

मानसिक तणावापासून सुटका मिळवायची असेल तर निरोगी दिनचर्या लक्षात ठेवा. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. मॉर्निंग वॉक करा तसेच व्यायाम आणि ध्यान करा. तणावावर मात करण्यासाठी आरोग्यदायी आहार उपयुक्त ठरेल. दिवसातून १० ते १५ मिनिटे शांत बसा.

Mental Health
Muscular Symptoms : कमी वयात सतावतोय तरुणांना सांधेदुखीचा त्रास, कारण काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

2. पुरेशी झोप

झोपेच्या कमतरतेचा थेट परिणाम आपल्यावर मेंदूवर होतो. त्यामुळे सतत चिडचिड होते. अनावश्यक ताण देखील वाढतो. यासाठी वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा. त्यासाठीपूर्ण ८ ते ९ तासांची झोप घ्या. झोपण्याच्या अर्धा तास आधी स्क्रीन टाइमपासून लांब राहा. रात्रीचा चहा किंवा कॉफी कमीत कमी प्या.

3. स्वत:ला आनंदी ठेवा

स्वत:ला आनंदी आणि व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. तुमचा छंद जोपासा. व्यस्त जीवनशैलीतून तुम्ही इनडोअर गेम्स खेळा ज्यामुळे तुमच्या मनाला शांत वाटेल. नकारात्मकता कमी होईल.

Mental Health
Harmful Foods : शरीरासाठी विषच! हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, लिव्हरसाठी ठरतील हानिकारक

4. मित्र-मैत्रिणींशी बोला

ज्या वेळी तुमच्या मनात नकारात्मकतेचा विचार येईल त्या क्षणी मित्र-मैत्रिणींशी बोला. स्वत:साठी वेळ काढा. तुमचा आनंद आणि यश त्यांच्यासोबत शेअर करा. हसण्यामुळे आनंदी संप्रेरके बाहेर पडतात. ज्यामुळे मन शांत राहाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com