Skin Care in Cold Weather  Saam TV
लाईफस्टाईल

Skin Care in Cold Weather : थंडीच्या दिवसांत 'या' पद्धतीने घ्या त्वचेची काळजी; रुक्ष आणि कोरडी स्किन कापसासारखी सॉफ्ट होईल

Skin Care Tips : रुक्ष त्वचा कापसासारखी सॉफ्ट होईल. हिवाळ्यात स्किन केअरसाठी या टिप्स नक्की फॉलो करा.

Ruchika Jadhav

दिवाळीमध्येच हिवाळा ऋतु सुरू होतो. राज्यात आणि देशभरात हिवाळ्याल सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी सकाळच्यावेळी धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. हिवाळा प्रत्येक व्यक्तीचा आवडता ऋतू आहे. अनेक जण थंडीच्या दिवसांत ट्रेकिंगसाठी घराबाहेर पडतात. हिवाळा प्रत्येकाला आवडत असला तरी आपल्या त्वचेला तो आवडत नाही. हिवाळ्यात त्वचा फार कोरडी होते. काही मुलींची त्वचा इतकी कोरडी होते की त्वचा थेट फाटते. तसेच ओठ देखील फाटतात. त्यामुळे असे होऊ नये म्हणून हिवाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्यावी त्याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

खाण्यापिण्याचे पदार्थ

कोणत्याही ऋतुमध्ये सुदृढ राहण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आपलं अंतर्गत शरीर. त्यामुळे तुम्ही स्किनवर कितीही प्रोडक्ट अप्लाय केले तरी सर्वात आधी तुमच्या स्किनला शरीरातून योग्य ते प्रोटीन मिळणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वात आधी तेलकट आणि स्निग्ध पदार्थ खाण्यास सुरुवात करा. थंडीच्या दिवसांत आपली हाडे सुद्धा ठिसूळ होतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल अशी बाजरीची भाकरी आणि अन्य पदार्थ खाण्यास सुरुवात करा.

टोनर

थंडीमध्ये चेहऱ्यावरील आणि स्किनवरील ओपन पोर्स आणखी जास्त वाढतात. ते कमी व्हावेत त्यासाठी फेसवॉश केल्यानंतर लगेचच टोनर अप्लाय करा. टोनरने त्वचा अगदी सॉफ्ट होते.

मॉश्चराइजर

प्रत्येक व्यक्तीची स्किन वेगवेगळ्या पद्धतीची असते. तसेच स्किनशी संबंधित हिवाळ्यात समस्या आणखी वाढतात. या समस्या दूर व्हाव्यात यासाठी मॉश्चराइजर वापरताना ते तुमच्या स्किन टाइपला सूट होते का याची माहिती घ्या. त्यानंतरच स्किनवर मॉश्चराइजर अप्लाय करा. चकीचं मॉश्चराइजर लावल्याने स्किन आणखी जास्त खराब होण्याची शक्यता असते.

स्टिम

तुमची त्वचा फार जास्त कोरडी झाली असेल तर त्यावेळी त्यातील मॉश्चर टिकवून ठेवण्यासाठी स्टिम घ्या. स्टिम घेतल्याने स्किन मुलायम होते. त्यासह तुमच्या त्वचेवरील डेड स्किन सुद्धा निघून जाते.

दुधाची मलई

काही व्यक्तींच्या घरात फुल फॅट असलेलं दूध येतं. तुमच्याकडे सुद्धा असं दूध येत असेल तर त्याची मलाई बाजूला काढून ठेवा. ही मलाई रोज रात्री झोपताना स्किनवर अप्लाय करा. त्याने त्वचा कोमल होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT