सणावाराला सुंदर दिसण्यासाठी आपण नवे कपडे, नवे दागिने खरेदी करतो. त्याचप्रमाणे मेकअप लुकने आपण सणावाराला जास्त सुंदर दिसतो. मार्केटमध्ये विविध प्रकारचे प्रोटक्ट येतच असतात. तुम्ही जर फक्त सणावारालाच मेकअप करत असाल. तर तुम्ही घेतलेले प्रोडक्ट किंवा मेकअप करताना केलेली चूक तुमचं नुकसान करेल. तुम्ही सुंदर दिसण्यासाठी घालवलेला पैसाच तुमचं नुकसान करेल. अशा समस्येपासून वाचण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता.
मेकअप केल्यावर तुमचा चेहरा उजळ आणि नॅच्युरल दिसतो. पण त्यासाठी तुम्ही योग्य फाउंडेशनचा वापर केला तरच तुम्ही सुंदर दिसता. फाउंडेशन हा मेकअपचा बेस असतो. जर तुम्ही सावळे असाल आणि डार्क कलरचे फाउंडेशन वापरत असाल तर, तुमचा चेहरा भडक दिसेल. म्हणून फाउंडेशन घेताना तुमच्या मानेला, हाताला किंवा चेहऱ्याला लावून पाहा.
सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर क्लींजरने डीप क्लीन करा. मग चेहऱ्याला मॉइस्चरायजर लावा. समजा तुमची स्कीन ऑयली असेल तर तुम्ही जेल बेस्ट मॉइस्चरायजरचा वापर करू शकता.
मॉइस्चरायजर लावल्यावर ५ मिनिटे थांबा. त्याने ऑइल कमी होईल आणि चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे फोड येणार नाहीत. पुढे तुम्ही प्रायमर चेहऱ्याला लावून घ्या. त्याने फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड व्हायला मदत होते. तसेच मेकअप करण्याआधी बेस चांगला तयार होतो.
तुम्ही जर आयशॅटो अप्लाय करायचे असेल तर तुम्ही आता करू शकता. पुढे तुमच्या जिथे डाग असतील तिथे कलर करेक्टर अप्लाय करा. त्या ऐवजी कंसीलरचा सुद्धा अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्ही फाउंडेशन लावून घ्या. त्याने आय शॅडो किंवा मस्कारा अशा गोष्टी फाउंडेशन कवर होतात.
फाउंडेशन लावताना समान प्रमाणात लावा. कमी जास्त वापरल्यावर तुमच्या चेहऱ्याचा नॅच्युरलपणा जाईल. त्यामुळे फाउंडेशन ब्लेंड करताना ते एकसमान करा. कुठेच त्याचे डाग दिसू देऊ नका. टॅप टॅप करत तुम्ही चेहऱ्याला फाउंडेशन लावून घ्या. ब्युटी ब्लेंडर पाण्यात भिजवून पिळून मगच वापरा. मग त्यावर लुज पावडर अप्लाय करून छान तयार व्हा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.