Train Traveling With Saree Saam TV
लाईफस्टाईल

Train Traveling With Saree: साडी नेसल्यावर ट्रेन पकडताना पडण्याची भीती वाटते? मग 'या' टिप्स आजच वाचा

Train Traveling With Saree Tips: साडी म्हटलं की थोडं टेन्शन असतंच. तरुण मुलींना तर साडी नेसल्यावर चालता सुद्धा येत नाही. त्यामुळे प्रवासात त्यांची मोठी गैरसोय होते.

Ruchika Jadhav

अनेक महिला कामानिमित्त घराबाहेर पडतात. प्रवासात झटपट चालण्यासाठी धावण्यासाठी जीन्स कंफर्टेबल वाटते. मात्र कमी महिलांना जीन्स परिधान करणे आवडत नाही. त्यामुळे बऱ्याच महिला आजही साडी परिधान करतात. आता साडी म्हटलं की थोडं टेन्शन असतंच. तरुण मुलींना तर साडी नेसल्यावर चालता सुद्धा येत नाही. त्यामुळे प्रवासात त्यांची मोठी गैरसोय होते.

साडी नेसून ट्रेनमध्ये चढताना अनेक महिलांचा अपघात देखील होतो. साडी पायात अडकते आणि महिला किंवा तरुणी खाली पडतात. आता खाली पडलं की एका महीलेपाठोपाठ बाकीच्या सुद्धा पडतात. साडी नेसून ट्रेनमध्ये प्रवास करण्याची ही गैरसोय पाहता आम्ही काही टिप्स शोधल्या आहेत. या टिप्समधून आम्ही तुम्हाला साडी नेसल्यावर ट्रेनमध्ये कसे जायचे याची माहिती सांगणार आहोत.

साडीचा पदर पिनअप करा

साडी नेसताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ती म्हणजे ट्रेन पकडायची असेल तर साडीचा पदर पिनअप करून घ्या. कारण फोइंग पल्लूमध्ये साडी नेसून ट्रेन पकडणे करणे फार कठीण जाते. त्यामुळे तुमचा अपघात देखील होऊ शकतो.

फोइंग पल्लू पोटावर खोचून घ्या

काही महिलांना फ्लोइंग पल्लू फार आवडतो आणि त्यांना तसाच पदर हवा असतो. जर तुम्ही पदर फोइंग ठेवला असेल तर तो खोचून घ्या. त्यामुळे ट्रेन पकडत असताना पदर गर्दीत अडकणार नाही आणि ट्रेन नीट पकडता येईल.

साडीच्या मिऱ्या कमरेवर खोचून घा

साडीच्या मिऱ्या जास्त असतील तर त्या कमरेवर खोचून घ्या. त्याने देखील तुम्हाला झटपट ट्रेन पकडता येईल. ट्रेन पकडताना साडीच्या मिऱ्या बऱ्याचदा पायामध्ये लोळतात. त्यामुळे महिला पायात पाय अडकून पडण्याची भीती असते. यासाठी तुम्ही ही टिप वापरू शकता.

बॅग पोटाजवळ घ्या

जर तुम्ही वनसाईड बॅग घेतली असेल तर ती पुढे पोटाजवळ घ्या. तसेच तुम्ही नॉर्मल बॅग वापरत असाल तरी देखील तुमची बॅग पोटाजवळच ठेवा. बॅग मागे राहिल्यावर गर्दीमुळे ती मागच्या मागे अटकते आणि आपणही मागे खेचले जातो. त्यामुळे बॅग नेहमीच पोटाजवळ ठेवली पाहिजे.

टीप : ही माहिती सामान्य आहे. आम्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT