Reduce Cholesterol Naturally Saam Tv
लाईफस्टाईल

Reduce Cholesterol Naturally: घाणेरड्या कोलेस्ट्रॉलवर किचनमध्येच रामबाण उपाय, 'या' पदार्थामुळे धमण्या-नसांमधून धावेल १०० च्या स्पीडने रक्त

Pumpkin Seeds For Cholesterol: भोपळ्याच्या बिया हृदयासाठी उपयुक्त घटकांनी भरलेल्या असतात. दररोज सेवन केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदय निरोगी राहते.

Sakshi Sunil Jadhav

भोपळ्याच्या बियांमुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.

हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तवाहिन्या मजबूत होतात.

या बियांतील अँटिऑक्सिडंट्स सूज कमी करून हृदयाचे रक्षण करतात.

कोलेस्ट्रॉलची समस्या आता मोठ्या संख्येने वाढत चालली आहे. याचं एक कारण म्हणजे दैनंदिन आहार. तुम्ही जर योग्य आहार घेतला नाही तर भविष्यात तुम्हाला ना ना प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. पुढे आपण कोलेस्ट्रॉल आणि हार्टच्या निगडीत तक्रारी दूर करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचा वापर करता येतो का? आणि याचा शरीरावर कसा परिणाम होतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

भोपळ्याच्या बियांमध्ये हृदयासाठी उपयुक्त फॅट्स, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात. फक्त चविला चांगले म्हणून नाही, तर या बिया आपल्या हृदययाचे आणि रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात. संशोधनानुसार, दररोज भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचं प्रमाण संतुलित राहतं, रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारतं आणि शरीरातील सूज कमी होते. या बियांमधील फायटोस्टेरॉल्स, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स हे घटक खराब कोलेस्टेरॉल कमी करत आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची संख्या वाढवतात. त्यामुळे हृदय अधिक निरोगी राहते आणि औषधांशिवाय कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो.

भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले फॅटी अॅसिड्स, विशेषतः ओमेगा-६ आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, हे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात. यामुळे रक्तवाहिन्यांमधील प्लाक जमण्याची शक्यता कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

तसेच या बियांतील फायटोस्टेरॉल्स हे नैसर्गिक घटक आहेत. जे शरीरात कोलेस्टेरॉल शोषण कमी करून रक्तातील एकूण कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात. भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स व्हिटॅमिन ई, कॅरोटिनॉइड्स आणि पॉलीफिनॉल्स हे रक्तवाहिन्यांचे नुकसान टाळतात आणि सूज कमी करून हृदयाचे रक्षण करतात.

त्याचबरोबर मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता टिकवण्यात मदत करते. संशोधनात असंही दिसून आलं आहे की, भोपळ्याच्या बियांचे तेल रोज सेवन केल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी होतो आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढतं. म्हणूनच, भोपळ्याच्या बिया हे फक्त कुरकुरीत स्नॅक नसून तुमच्या हृदयासाठी नैसर्गिक ढाल ठरू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या चरणी 5 कोटी 18 लाखांचे दान

Peacock Lifespan: किती वर्षे जिवंत राहतो भारताचा राष्ट्रीय पक्षी, उत्तर वाचून व्हाल थक्क

Dharmendra Health Update:ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; कुटुंबातील सर्व सदस्य पोहोचले रुग्णालयात

Pani Puri Receipe: नेहमीचं चटपटीत पाणी सोडा, पाणीपुरीसाठी ५ मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल झणझणीत पाणी

अखेर मनोमिलन झालं! शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादींची युती|VIDEO

SCROLL FOR NEXT