Railway Rules
Railway Rules  Saam Tv
लाईफस्टाईल

Railway Rules : रेल्वेचे तत्काळ तिकीट रद्द केल्यावर किती रिफंड मिळतो? बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या नियम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indian Railways Tatkal Ticket Cancellation Charge Rules : आपण सर्वांनी कधी ना कधी भारतीय रेल्वेने प्रवास केलाच असेल. जगातील चौथ्या क्रमांकाच्या या रेल्वे नेटवर्कमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून रेल्वेने अनेक नियम केले आहेत, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये.

रेल्वेने (Railway) तिकीट बुकिंगबाबत अनेक महत्त्वाचे नियम (Rules) आहेत. रेल्वे तिकीट बुक करण्यापूर्वी, तुम्हाला हे माहित असले पाहिजे की जर तुम्ही तत्काळ तिकीट रद्द केले असेल तर तुम्हाला किती परतावा मिळेल? तत्काळ तिकीट बुकिंग रद्द केल्यावर आयआरसीटीसी तुम्हाला परतावा कसा देते हे अनेकदा लोकांना माहीत नसते. याविषयीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

तत्काळ तिकीट परतावा देण्याचा नियम काय आहे?

तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तुमचा प्रवास रद्द करावा लागला असेल आणि तुम्ही तत्काळ तिकिटे बुक केली असतील, तर जाणून घ्या की ऑनलाइन (Online) आणि ऑफलाइन (Offline) तिकिटांसाठी वेगवेगळे नियम लागू होतात.

उदाहरणार्थ, जर तुम्ही ऑनलाइन तिकीट घेतले असेल आणि चार्ट तयार होईपर्यंत तुमचे तिकीट प्रतीक्षा यादीत असेल, तर तुमचे तिकीट आपोआप रद्द होईल. यानंतर, पुढील काही दिवसांत तिकिटाची रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल.

दुसरीकडे, जर तुम्ही ऑफलाइन रेल्वे आरक्षण काउंटरवरून तिकीट घेतले असेल, तर तुम्हाला तिकीट रद्द करण्यासाठी पुन्हा आरक्षण काउंटरवर जावे लागेल.

कन्फर्म तिकीट रद्द करण्याचे नियम -

तत्काळ तिकीट बुक करण्यापूर्वी, हे जाणून घ्या की जर तुमचे तिकीट कन्फर्म झाले असेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे तिकीट रद्द करायचे असेल तर तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही.

प्रतीक्षा यादीतील तिकिटे रद्द करण्याचे नियम -

तुम्ही तत्काळ तिकीट ऑनलाइन बुक केले असेल आणि ते अजूनही प्रतीक्षा यादीत असेल, तर रद्द झाल्यास, रेल्वे ते न वापरलेले डब्ल्यूएल/आरएसी तिकीट मानते. याचा अर्थ असा की जर तुम्ही ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या 30 मिनिटे आधी तिकीट रद्द केले असेल तर तुम्हाला 60 रुपये कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही तिकीट रद्द केले असेल तर तुम्हाला कोणताही रिफंड मिळणार नाही.

ट्रेन रद्द झाल्यास किती रिफंड दिला जाईल -

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर ट्रेन कोणत्याही आपत्कालीन स्थितीमुळे रद्द झाली असेल, तर तुम्हाला तुमच्या तत्काळ तिकिटावर पूर्ण परतावा मिळेल. ऑनलाइन तिकीट घेतल्यास, ते तुमच्या बँक खात्यात मिळते, तर ऑफलाइन तिकीट घेताना, तुम्हाला आरक्षण काउंटरवर जाऊन हे तिकीट रद्द करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला परतावा मिळेल. यासाठी ट्रेनच्या नियोजित वेळेच्या 3 दिवसांच्या आत तिकीट रद्द करावे लागेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला ते संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती, चंद्रहार पाटील यांचा रोख कोणाकडे?

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT