Sunscreen Frequency  saam tv
लाईफस्टाईल

Sunscreen Frequency : एका दिवसात किती वेळा सनस्क्रीन लावली पाहिजे? सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धतही जाणून घ्या

Sunscreen Frequency summer: उन्हाळ्याच्या दिवसांत सनस्क्रिनचा वापर केला जातो. मात्र एका दिवसात किती वेळा सनस्क्रिनचा वापर केला पाहिजे हे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या काय आहे योग्य पद्धत.

Surabhi Jayashree Jagdish

सनस्क्रीन आपल्या त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसात चेहऱ्यासाठी सनस्क्रिन वापरण्याचा सल्ला देतात. सूर्याची अल्ट्रावॉयलेट (UV) किरणं आपल्या त्वचेचं नुकसान करतात. यामुळे चेहरा आणि त्वचेवर सुरकुत्या किंवा त्वचेचा कॅन्सर यांच्यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

एकंदरीत उन्हाळ्याच्या दिवसांत सनस्क्रीनचा वापर गरजेचा आहे. मात्र तुम्हाला माहितीये का, एका दिवसात किती वेळा सनस्क्रिनचा वापर केला पाहिजे? शिवाय सनस्क्रिन योग्य पद्धतीने न लावल्यास किती नुकसान होतं? या आर्टिकलच्या माध्यमातून आपण ही गोष्ट जाणून घेऊया.

दिवसातून किती वेळा सनस्क्रिन लावली पाहिजे?

कदाचित तुम्ही ऐकलं असेल की सनस्क्रीन लावल्याने तुमच्या त्वचेला किंवा चेहऱ्याला दिवसभर संरक्षण मिळतं. मात्र हे चूक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिवसातून कमीत कमी २ ते ३ वेळा सनस्क्रिन लावली पाहिजे. जेव्हा तुम्ही घराबाहेर पडत असाल तेव्हा तर तुम्ही याचा वापर केलाच पाहिजे.

सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत

  • सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. जेणेकरून सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमचं संरक्षण होईल.

  • जर तुम्ही पूर्ण दिवस बाहेर असाल तर प्रत्येक २ किंवा ३ तासांनी सनस्क्रिन लावलं पाहिजे.

  • जर तुम्ही स्विमींग करत असाल किंवा तुम्हाला जास्त प्रमाणात घाम येत असेल तेव्हा सनस्क्रिनचा परिणाम कमी होतो. अशावेळी फ्रेश वाटण्यासाठी तुम्ही सनस्क्रिन लावली पाहिजे.

योग्य पद्धतीने न वापरल्यास होणारं नुकसान

त्वचेवर सुरकुत्या

सूर्याची हानिकारक किरणं तुमच्या त्वचेला नुकसान करतात. अशावेळी जर तुम्ही सनस्क्रिनचा वापर केला नाही तर सुरकुत्या, डार्क स्पॉट्स आणि फाईन लाईन्स दिसू शकतात.

त्वचेचा कॅन्सरचा धोका

सूर्याच्या किरणांमुळे त्वचेच्या DNA वर विपरीत परिणाम होतो. ज्यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. अशावेळी सनस्क्रिन तुमचा त्वचा डॅमेज होण्यापासून मदत करते.

एलर्जी

सूर्याच्या किरणांमुळे तुमच्या त्वचेला एलर्जी होण्याचा धोका असतो. यामध्ये चेहरा किंवा त्वचा लाल होणं, सूजणं असा समस्या उद्भवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT