Diwali lamp flame using Trataka google
लाईफस्टाईल

Diwali Meditation: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दिवाळीतल्या दिव्यांचा करा वापर, वाचा तज्ज्ञ काय म्हणाले

Memory Boost Tips: दिवाळीच्या दिव्यांवर लक्ष केंद्रित करून स्मरणशक्ती वाढवा. त्राटक पद्धत डोळे व मन शांत ठेवते, मानसिक तणाव कमी करते आणि झोप सुधारते. तज्ज्ञांच्या टिप्ससह घरगुती पद्धत जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

दिवाळी हा सण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने धामधुमीत साजरा केला जातो. दिवाळी हा सण दिव्यांचा किंवा रोषणाईचा असल्याचे सांगितले जाते. प्रत्येकाच्या दारासमोर दिव्याची रांग लागलेली असते. पण तुम्हाला माहित आहे का, दिवा हा भक्त प्रकाश पाडायचे काम करत नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर असतो. तुमची एकाग्रता वाढवण्यासाठी हा दिवा खूप फायदेशीर ठरतो. पुढे आपण याच्या स्टेप्स आणि फायदे जाणून घेणार आहोत.

(How Focusing On Lamp Flame Improve Concentration)

तुम्हाला माहितीये का दिव्याला पाहून एकाग्रता वाढवण्याची क्षमता जास्त वाढते. ही एक प्राचीन पद्धत आहे. याचा फायदा तुम्हाला योग्य वेळी, योग्य त्या क्षणी निर्णय घेण्यासाठी होते. या टेकनिकला त्राटक (Trataka) असेही म्हंटले जाते. तज्ज्ञांच्या मते, त्राटक अभ्यास पैरासिंपेथेटिक नर्व सिस्टीम ला सक्रीय करण्याचे काम करतो. त्यामध्ये मनाला आणि शरीराला शांती मिळते. याने श्वास नॉर्मल होऊन ह्दयाची धडधड नियंत्रणात येते. कारण जेव्हा डोळे स्थिर असतात तेव्हा डोक्यात विज्युअलचा भाग सक्रीय होतो.

दिव्यावर लक्ष केंद्रित करणे तुमच्या आरोग्यासाठी खरोखर चांगले आहे का?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन स्टडीजनुसार, ही पद्धत डोकेदुखीपासून आराम देते आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते. याने डोळ्यांची स्थिरता सुधारली असल्याचे दिसून आले. यावरून असं स्पष्ट होतं की त्राटकाचा सराव केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकते. त्राटकचा सराव केल्याने निद्रानाशाची लक्षणे कमी झाली आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

दिव्याच्या मदतीने ध्यान कसे करावे?

ध्यान करण्यासाठी शांत जागा निवडा.

एक दीर्घ श्वास घ्या आणि दिव्याच्या जळत्या वातीकडे पाहा.

सुरुवातीला १ मिनिट ध्यान करा.

तुमच्या डोळ्यांनी वातीची हालचाल पहा.

तुमचे डोळे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

कल्पना करा की तुमचे दोन्ही डोळे एकत्र येऊन एक डोळा बनला आहे. ज्यामुळे तिसरा डोळा (अंतर्ज्ञानी चक्र) सक्रिय होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT