Fitness benefits, fast walking benefits, Benefit of brisk walking, benefits of walking in Marathi, Speed Walking ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Benefits of Walking: वेगाने चालल्यास शरीराला त्याचा फायदा कसा होईल ?

वेगाने चालल्यास शरीराला कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वजन कमी करण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. अनेक खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते आपल्या व्यायामापर्यंत सगळ्यात बदल करतो.(Benefits of walking in Marathi)

हे देखील पहा -

वजन कमी करण्यासाठी बरेच जण आपल्या चालण्याचा व धावण्याचा सल्ला देतात. दिवसभर आपण चालण्याने आरोग्यास त्याचे अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी आपण काही ध्येय निश्चित करायला हवे. आपण दिवसभरात किती चालतो ? त्याची ठरवलेली वेळ किती असायला हवी ? चालताना पाऊले कशी टाकावी यावर सगळ अंवलबून असते. वेगाने चालल्यास शरीराला कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी दररोज ५ ते १० हजार पावले चालण्याचे ध्येय आपण ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.लोक चालतात याची अनेक कारणे आहेत. मात्र, तुम्ही ज्या वेगाने चालणे निवडता ते आरोग्यासाठी किती प्रभावी ठरू शकते हे निश्चित करते. मंद गतीने चालणे, फेरफटका मारल्याने आपले मन आणि शरीर दोघांनाही आराम मिळतो आणि गुडघ्याच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला मार्ग आहे. घाई असताना आपण पळत किंवा वेगाने चालत असू तर त्याला ब्रिस्क वॉक असे म्हटले जाते. यात शरीराची पूर्ण हालचाल होऊन यात हृदय वेगाने काम करते. आरामशीर चालणाऱ्यांच्या तुलनेत जलद गतीने चालणाऱ्यांना अधिक फायदा होतो.

वेगाने चालण्याचे अनेक फायदे (Benefits of fast walking)-

१. वेगाने चालल्यास आपल्याला वजन कमी (Weight loss) करण्यास मदत करते. दररोज १० ते ३० मिनिटांचा ब्रिस्क वॉक केल्याने फायदेशीर ठरते. तसेच चालण्याबरोबर आपल्याला पुरेसा आहार घेणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे वेगाने चालल्यास आपल्या हृदयाची गती वाढते व आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच हृदयाचे स्नायू बळकट होतात व शरीराला आवश्यक रक्ताभिसरणासाठी जलद गतीने काम करतात.

२. चालण्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. परंतु वय आणि फिटनेसमुळे आपण चालताना योग्यप्रकारे स्वत:ची काळजी घ्या. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि शेवटी आपल्या हृदयाची गती वाढते. वजन कमी करण्यासाठी चालण्याची गतीही वाढवावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

SCROLL FOR NEXT