Chanakya Niti On Smart People Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Smart People : बुद्धिमान व्यक्ती कसा ओळखाल ? जाणून घ्या चाणक्यांकडून

Intelligent People : प्रत्येक व्यक्तीला त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेवरुन कळते की, तो किती बुद्धिमान आहे ते.

कोमल दामुद्रे

Smart People by Chanakya Niti : कोणत्याही कठीण परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान मिळत असेल तर तुम्ही सगळ्यात हुशार व्यक्ती आहात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेवरुन कळते की, तो किती बुद्धिमान आहे ते.

आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की, बुद्धिमान व्यक्ती हा नेहमी दोन्ही गोष्टींचा विचार करतात ज्यामध्ये काही सकारात्मक व नकारात्मकता दोन्ही असते. पण आयुष्यात प्रत्येकालाच बुद्धिमान होण्याची इच्छा असते. आपल्या पेक्षा अधिक हुशार (Intelligence) माणसांचे कौतुक ऐकले की, आपल्यालाही प्रश्न पडतो की, आपणही बुद्धिमान असायला हवे. अशातच आपणही बुद्धिमान आहोत हे कसे कळेल. जाणून घ्या चाणक्यांकडून

1. आचार्य चाणक्य यांच्या मते, जे ज्येष्ठांचा आदर करतात आणि त्यांच्या शब्दांचे पालन करतात ते बुद्धिमान असतात. या प्रकारचे लोक इतरांमध्ये प्रेम शोधतात. अशा लोकांना इतरांमध्ये कधीही कमतरता दिसत नाही कारण ते स्वतः चांगले लोक असतात.

2. जे धैर्यवान असतात ते आपल्या ध्येयाप्रती समर्पित राहतात. यशासाठी (Success) योग्य वेळी योग्य पावले उचलणारे लोक बुद्धिमान लोकांच्या श्रेणीत येतात.

3. चाणक्याच्या नीतिशास्त्रानुसार, बुद्धिमान लोक नेहमी टीमवर्कवर विश्वास ठेवतात, त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात यश मिळते.

4. चाणक्याच्या मते, बुद्धिमान लोकांमध्ये इतरांपेक्षा अधिक विचार करण्याची क्षमता असते. अभ्यासाच्या जोरावर तो विद्वानांनाही पराभूत करू शकतो.

5. शहाणे लोक कधीही इतरांना सल्ला देत नाहीत. कारण त्यांना माहित आहे की सामान्य लोक कोणत्याही फुकटच्या गोष्टीला निरुपयोगी समजतात आणि त्या फुकटच्या गोष्टीला ते गांभीर्याने घेत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात जोरदार पावसाला सुरुवात, शेती कामांना येणार वेग

Jio Recharge Offer: जिओ ₹९४९ vs ₹९९९ Plan, जिओचे टॉप प्लॅन फायदे जाणून घ्या

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा इशारा

FASTag Pass: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! ३००० रुपयांचा पास अन् वर्षभर मोफत प्रवास, या अ‍ॅपवर करता येणार अर्ज

Rajgira Ladoo Recipe : श्रावणात उपवासाला खास बनवा राजगिऱ्याचे लाडू, वाचा सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT