Dhanshri Shintre
रिलायन्स जिओचे ९४९ आणि ९९९ रुपयांचे प्लॅन कसे वेगळे आहेत? त्यांच्या सुविधा आणि फायदे जाणून घ्या.
रिलायन्स जिओच्या ९४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटाचा लाभ मिळतो.
९४९ रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये २ जीबी डेटासह दररोज १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.
८४ दिवस वैध असलेल्या या प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा मोफत अॅक्सेस दिला जातो.
जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा वापरण्याची सुविधा उपलब्ध केली जाते.
या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसोबत दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सुविधा ग्राहकांना मिळते.
या प्लॅनमध्ये ९८ दिवस वैधतेसह ५० जीबी क्लाउड स्टोरेज आणि ९० दिवस जिओ हॉटस्टार मोबाइल/टीव्हीचा मोफत प्रवेश मिळतो.
दोन्ही जिओ प्लॅनमध्ये साधारण सारखेच फायदे आहेत, मात्र ९९९ रुपयांत अधिक वैधता तर ९४९ रुपयांत जिओ हॉटस्टारचा अतिरिक्त लाभ मिळतो.