Shreya Maskar
श्रावणात उपवासाला खाण्यासाठी झटपट राजगिरा लाडू बनवा.
राजगिरा लाडू बनवण्यासाठी राजगिरा, गूळ, वेलची पूड, तूप आणि सुका मेवा इत्यादी साहित्य लागते.
राजगिरा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून राजगिरा मंद आचेवर भाजून घ्या.
पॅनमध्ये गूळ आणि पाणी घालून पाक तयार करून घ्या.
भाजलेला राजगिरा आणि गूळ पाक छान एकत्र करून घ्या.
पुढे यात वेलची पूड आणि सुका मेवा टाकून मिश्रण एकजीव करा.
मिश्रण थोडे थंड झाल्यावर लाडू वळून घ्या
राजगिरा लाडू हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवा.