Liver Fat  google
लाईफस्टाईल

Liver Fat: लिव्हरमध्ये साचलेला फॅट वितळवण्यासाठी 'हे' एक पेय ठरेल बेस्ट, जाणून घ्या फायदे

Black Coffee Benefits: ब्लॅक कॉफी ही केवळ सकाळचं पेय नाही, तर लिव्हरमधील फॅट वितळवणारे नैसर्गिक औषध आहे. रोज 3-4 कप घेतल्याने लिव्हर हेल्दी आणि सक्रिय राहतो.

Sakshi Sunil Jadhav

कॉफी ही अनेकांच्या दिवसाची सुरुवात करणारे पेय आहे. सकाळच्या वेळेला कॉफीचा कप घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरूच होत नाही. पण ही फक्त एक मॉर्निंग ड्रिंक नसून आरोग्यासाठी फायदेशीर औषधासारखीही आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ च्या माहितीनुसार, कॉफीमध्ये कॅफीन, क्लोरोजेनिक अॅसिड, ट्रायगोनेलिन, डाइटरपीन आणि मेलानोइड्स हे घटक असतात. हे घटक शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र या कंपाऊंड्सचा फायदा शरीराला मिळण्यासाठी कॉफी पिण्याची पद्धत योग्य असणं आवश्यक आहे.

अनेकजण कॉफीमध्ये हेवी क्रीम, साखर, स्वीटनर किंवा दूध मिसळून घेतात, पण तज्ज्ञांच्या मते यामुळे कॉफीचे गुणधर्म नष्ट होतात आणि ती शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे ब्लॅक कॉफी म्हणजेच साखर आणि दूध न घातलेली कॉफी आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरते.

इंस्टाग्रामवर गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट डॉ. शुभम वत्स्य यांनी सांगितले की, ब्लॅक कॉफी हे फक्त एक साधे पेय नसून औषधासारखं काम करतं. त्यांनी म्हटले आहे की, शुगर फ्री आणि दूधाची ब्लॅक कॉफी नैसर्गिक ड्रिंक आहे. त्यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेलं फॅट वितळवण्यास मदत होते आणि दीर्घकालीन नुकसानापासूनही संरक्षण करते.

ब्लॅक कॉफी लिव्हरसाठी खूप फायदेशीर असते. नियमितपणे दररोज तीन ते चार कप ब्लॅक कॉफी घेतल्यास लिव्हरमध्ये साचलेले फॅट कमी होतात, लिव्हरचे कार्य सुधारते आणि मेटाबॉलिझमलाही चालना मिळते. शिवाय, शरीरात फॅट जमा होण्याची प्रक्रिया देखील नियंत्रणात राहते. त्यामुळे ब्लॅक कॉफीला लिव्हरचा गुड प्रोटेक्टर म्हटलं जातं.

टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. यातील दावे किंवा मतांचं आम्ही समर्थन करत नाही. कोणतेही उपचार, डाएट किंवा औषधं घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Scam: व्हॉट्सअ‍ॅपवर दिवाळी ऑफरचे मेसेज येतात? सावधान, अशी घ्या काळजी, अन्यथा...VIDEO बघा

Maharashtra Live News Update: राड्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे उद्या पुण्यात

Diwali Bonus: राज्यातील 'या' सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची धन धन दिवाळी; मिळाला २० वर्षातील सर्वाधिक बोनस

Crime : काम देतो म्हणत नेलं, सामूहिक अत्याचारानंतर बेदम मारलं; अमानुष छळामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

Sharad Pawar: निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला? बघा VIDEO

SCROLL FOR NEXT