Holi 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Chandra Grahan on Holi: होळीच्या दिवशी ४ तास ३६ मिनिटे चंद्र ग्रहण; 'या' राशीच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Chandra Grahan : या वर्षी पहिलं चंद्र ग्रहण होळीला दिसणार आहे. ज्योतिष विद्यामध्ये चंद्र ग्रहणाला विशेष महत्व आहे. या वर्षीचं पहिलं चंद्र ग्रहण हे मार्च महिन्यात पाहायला मिळणार आहे.

साम टिव्ही

Rashifal Lunar eclipse:

या वर्षी पहिलं चंद्र ग्रहण होळीला दिसणार आहे. ज्योतिष विद्यामध्ये चंद्र ग्रहणाला विशेष महत्व आहे. या वर्षीचं पहिलं चंद्र ग्रहण हे मार्च महिन्यात पाहायला मिळणार आहे. २५ मार्च म्हणजे होळीच्या दिवशी पहिलं चंद्र ग्रहण पाहायला मिळणार आहे. (Latest Update)

दृक पंचांगच्या अनुसार, होळीच्या दिवशी चंद्र ग्रहण ४ तास ३६ मिनिटे ५६ सेकंद राहणार आहे. जगभरातील काही देशात हे चंद्र ग्रहण पाहायला मिळेल. मात्र, भारतातील लोकांना चंद्र ग्रहण पाहता येणार नाही. हे चंद्र ग्रहण काही राशींना प्रभावित करणार आहे. चंद्र ग्रहणाचा काही राशीवर सकारात्मक परिणाम होईल, तर काही राशींनी सावधान राहण्याची गरज आहे.

कन्या राशी

वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण हे कन्या राशीसाठी फायदेशीर ठरणार नाही. काही कामांना वेळ लागू शकतो. आर्थिक स्वरुपातील खर्च वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात किरकोळ भांडणे होण्याची शक्यता आहे. यामुळे या राशीच्या लोकांनी सावधान राहणे गरजेचे आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना वर्षाचं पहिलं चंद्र ग्रहण शुभ राहणार नाही. या राशीच्या लोकांना कार्यालयात कामाचा ताण हाताळावा लागेल. व्यापारी लोकांसाठी हा दिवस अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी व्यापाऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे.

मीन राशी

वर्षाचं पहिलं चंद्र ग्रहण या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार नाही. वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवनात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मानसिक आरोग्यात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. प्रवास करताना सतर्कता बाळगावी. तुम्ही तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT