Honey Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Honey Benefits : फक्त खाण्यासाठीच नाही तर 'या' गोष्टींसाठी देखील केला जातो मधाचा वापर !

Health Tips : मधात उपलब्ध असणारे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते तसेच सौंदर्यासाठी सुद्धा मध तितकेच फायदेशीर असते.

कोमल दामुद्रे

Unexpected Uses Of Honey : मध हे चवीला अतिशय गोड आणि चवदार असते. मधात उपलब्ध असणारे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते तसेच सौंदर्यासाठी सुद्धा मध तितकेच फायदेशीर असते. आतापर्यंत जर तुम्ही मधाचा वापर फक्त खाण्यासाठी केला असेल, तर आज या लेखात तुम्हाला इतर काही मधाचे उपयोग जाणून घेण्यास मदत होईल.

पोटॅशियम,मॅग्निज ,फॉस्फरस, कॅल्शियम यासारखे पोषकतत्व मधात असतात. तसेच यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो त्यामुळे शरीरातील (Health) खोकला निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया शरीरा बाहेर काढण्यास सहाय्य करते म्हणून खोकल्याचा त्रास होत असल्यास मध खाण्याचा सल्ला अनेक लोक देतात.

1. कट किंवा स्क्रॅपवर उपचार

मधाचे त्वचेला अनेक प्रकारचे फायदे होतात.मध हे नैसर्गिक प्रतिजैविकासारखे काम करते त्यामुळे तुम्हाला जर कुठे दुखापत झाली असेल तर ती जागा स्वच्छ (Clean) करून थोडे शुद्ध मध त्यावर लावा आणि नंतर बँड- एडणे झाकून ठेवा.

2. निद्रानाशात आराम

निद्रानाशात या अवस्थेत झोपल्यानंतर तुम्ही जागे होता आणि रात्रभर झोप येत नाही याचा त्रास अनेकांना होत असतो. तुमच्यासोबत असे काही होत असेल तर अशा वेळेस तुमच्यासाठी मध उपयुक्त ठरेल. एक चमचा मधात चिमूटभर मीठ घालून त्याचे सेवन केल्याने झोप न येण्याची समस्या दूर होऊ शकते.

3. पिंपल्ससाठी सर्वोत्तम

जर तुम्ही पिंपल्सच्या (Pimples) समस्येपासून त्रस्त असाल तर चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी मध फायदेशीर ठरेल. मधात नैसर्गिक अँटी मायक्रोबियल हे गुणधर्म असते. पिंपल्स वर थोडे मध लावून तीस मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर चेहरा (Skin) स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावर मुरमाचे डाग हलके होण्यास मदत होईल.

4. चिंता दूर करण्यासाठी

अस्वस्थता दूर करण्यासाठी देखील मधाचा वापर करता येईल. कॅमोमाइल चहामध्ये एक छोटा चमचा मध आणि लिंबाचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करून त्याचा आनंद घ्या. यामुळे तुमची चिंता दूर होण्यास मदत मिळते.

5. डास चावणे उपाय

मधात असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म बाचवसाठी उपयुक्त ठरतात.डास चावल्याने होणारी खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी तसेच संसर्ग टाळण्यासाठी मध काम करते. तुम्हाला डास खूप चावत असतील आणि त्याच्या पुरळ त्रास देत असेल तर थोडं मध लावा. त्याने त्वचेवर होणारी जळजळ कमी होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Marathon News : ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला; घरी गेल्यानंतर स्पर्धकाचा अचानक मृत्यू

Vande Bharat Express : पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! ३० वर्षीय तरुणीवर गोळीबार, थेट छातीत गोळी घुसली

Maharashtra Live News Update: डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या निवडणुकीत हाणामारी

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेला प्रगतीचा मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT