सणासुदीच्या काळात अनेकजण नवीन बाईक किंवा कार खरेदी करतात. जर तुम्हीही दुचाकी घेण्याच्या विचारात असाल तर होंडाने एक नवीन बाईक नुकतीच बाजारात लाँच केली आहे. होंडाने Honda SP125 या बाईकचे नवीन 'स्पोर्टस एडिशन' लाँच केले आहे. आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनसह ही बाईक बाजारात उपलब्ध झाली आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
कंपनीने आपल्या नवीन बाईकची बुकिंग डिलरशीप आणि वेबसाइटद्वारे सुरु केली आहे. कंपनीने Honda SP125 स्पोर्टस एडिशनमध्ये नवीन कॉस्मेटिक बदल केले आहे. ही बाईक बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा वेगळी आहे. या बाईकमध्ये कोणतेही मॅकेनिकल बदल केले नाहीत.
कंपनीने बाईकबद्दल माहितीनुसार, Honda SP125 ही प्रीमियम कम्प्यूटर मोटारसायकल सेगमेंटमध्ये नवीन फिचर्स, स्टायलिश डिझाइनसाठी ओळखली जाईल. ही नवीन स्पोर्टस एडिशन बाईक ग्राहकांना आकर्षिक करेल. असं कंपनीचे सीईओ त्सुत्सुमु ओटानी यांनी म्हटले आहे.
फीचर्स
होंडाने नवीन Honda SP125 बाईक लाँच करुन आपली SP रेंज वाढवली आहे. यामध्ये मॅट कव्हर आणि नवीन ग्राफिक्ससह फ्लोटिंग इंधनाची टाकी दिली आहे. Honda SP125 ला LED हेडलॅम्पसह संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट दिला आहे. ज्यामध्ये गिअर, स्पीड, इंधन याची माहिती मिळते. या बाईकमध्ये 123.94cc क्षमता असलेले सिंगल सिलेंडर असून PGM-FI इंजिन देण्यात आले आहे. इंजिन 107.hp पॉवर आणि 10.9Nm चा टॉर्क जनरेट करते.
वॉरंटी आणि किंमत
होंडा कंपनीने या नवीन बाईकसाठी जबरदस्त वॉरंटी दिली आहे. होंडा कंपनीने आपल्या सर्व बाईकवर ७ वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी देते. मात्र, या बाईकसाठी कंपनीने अतिरिक्त ३ वर्षांची एक्सटेंडेंट वॉरंटी दिली आहे. म्हणजेच या बाईकवर एकूण १० वर्षांची वॉरंटी ग्राहकांना मिळणार आहे. Honda SP125 ची नवीन स्पोर्ट्स व्हर्जन बाईक डिसेंट ब्लू मेटॅलिक आणि हेवी ग्रे मेटल या रंगामध्ये सादर केली आहे. या नवीन बाईकची किंमत कंपनीने 90,567 रुपये ठेवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.