Pitrupaksh 2023: पितृपक्षात नैवद्यासाठी बनवा झटपट आणि चविष्ट भोपळ्याची भाजी; रेसिपी पाहा

Pumpkin Recipe : पितृपक्षात अनेक प्रकारचे नैवद्य बनवले जातात.
Pumpkin Recipe
Pumpkin RecipeSaam Tv
Published On

Red Pumpkin Recipe :

सध्या राज्यात सणासुदीला सुरुवात झाली असून अनेक वेगवेगळे पदार्थ घरात बनवले जातात. गणपतीनंतर पितृपक्ष सुरु झाला आहे. पितृपक्षात अनेक प्रकारचे नैवद्य बनवले जातात. या नैवद्यात प्रत्येक पदार्थाला विशेष महत्त्व असते.

पितृपक्षात नैवद्यासाठी भेंडीची भाजी, मेथीची भाजी, लाल माठ, भजी, भोपळ्याची भाजी, खीर, चपाती, वरण-भात, कढी असे अनेक पदार्थ असतात. त्यातील एक भाजी म्हणजे भोपळ्याची भाजी. भोपळ्याच्या भाजीला एक वेगळे महत्त्व आहे. भोपळ्याची भाजी खाण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करतात. अनेक लोकांना भोपळ्याची भाजी आवडत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भोपळ्याच्या भाजीची झटपट होणारी रेसिपी सांगणार आहोत. (Latest Utility News)

Pumpkin Recipe
Vande Bharat Sleeper Coach : वंदे भारतच्या स्लीपर कोचचा फर्स्ट लूक; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले फोटो शेअर

साहित्य

  • भोपळ्याच्या फोडी

  • चवीनुसार मीठ

  • जिरे

  • मोहरी

  • हिंग

  • लाल मिरची पावडर

  • कोथिंबीर

  • किसलेलं खोबर

  • कढीपत्ता

कृती

सर्वप्रथम एका कढईत किंवा पातेल्यात तेलात जिरं, मोहरीची फोडणी द्या. त्यानंतर त्यात कढीपत्ता आणि हिंग टाका. त्यानंतर गॅस कमी करुन त्यात लाल मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. फोडणी जळणार नाही याची काळजी घ्या. त्यात भोपळ्याच्या फोडी टाका. त्यात चवीनुसार मीठ टाका. त्यात एक चमचाभर पाणी टाका. 5-6 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या. त्यावर तुम्ही किसलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सजवा. जर तुम्हाला खोबरं नसेल टाकायचे तर त्यात शेंगदाण्याचा बारीक कूट टाकू शकता.

Pumpkin Recipe
Flipkart Big Billion Days 2023 : फ्लिपकार्टचा 'द बिग बिलियन डेज' आता क्‍लीअरट्रिपवर, बजेटमध्ये बुक करता येणार फ्लाइट तिकीट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com