Honda CB350 Saam Tv
लाईफस्टाईल

Royal Enfield ला टक्कर देणारं होंडाची बाईक! पॉवरफुल इंजिन, जबरदस्त लूकसह लॉन्च, किंमतही खिशाला परवडणारी...

Honda CB350 Price: होंडाने नवीन बाईक Honda CB 350 भारतात लाँच केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Honda CB350 Features And Specification:

होंडा ही देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. कंपनीने नवीन बाईक Honda CB 350cc भारतात लाँच केली आहे. होंडाने अधिकृतपणे ही घोषणा केली आहे.

सध्या भारतीय बाजारपेठेत रॉयल एन्फिल्ड कंपनीच्या बाईक जास्त दिसत आहेत. त्यामुळेच या बाईकला टक्कर देण्यासाठी होंडाने आपली नवीन बाईक लाँच केली आहे. कंपनीने ही बाईक दोन व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे.

किंमत

या बाईकच्या बेस मॉडेल Honda CB Deluxe मॉडेलची किंमत 1,99,900 रुपये तर Deluxe Pro मॉडेलची किंमत 2,17,800 रुपये आहे. होंडाने इतर कंपन्यांच्या तुलनेत चांगल्या किंमतीत बाईक लाँच केली आहे. ग्राहक ही बाईक कंपनीच्या डिलरशिपद्वारे बुक करु शकतात. तसेच बाईकची डिलिव्हरी लवकरच सुरु होणार आहे.

Honda CB350

कंपनीने नवीन बाईकला रेट्रो मॉडर्न लूक दिला आहे. हा लूक आधीच्या CB सीरीज मॉडेलसारखा आहे. यात मस्क्यूलर फ्लुएल टँक, स्टायलिश ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, गोल आकाराचे एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लॅम्प देण्यात आले आहे. रेट्रो क्लासिक लूकसह बाईक एकूण 5 रंगात सादर करण्यात आली आहे. यात प्रिशियस रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट क्रस्ट मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राउन कलरचा समावेश आहे. 

इंजिन

Honda CB 350 मध्ये, कंपनीने 348.36 cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर देण्यात आले आहे. हे इंजिन 5500 RPM वर 20.8bhp पॉवर आणि 3000 RPM वर 29.4Nm पीक टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये 5- स्पीड गिअरबॉक्स स्लिप आणि असिस्ट कल्चदेखील देण्यात आला आहे.

फिचर्स

नवीन बाईकच्या टॉप-स्पेक डीलएक्स प्रो व्हेरियंटमध्ये कंपनीने ब्लूटूथ सपोर्टसह होंडा स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टम , होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल, ड्युअल चॅनल ABS असे फिचर्स आहेत. यात एलईडी लाइटिंग, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, डबल लेयर एक्झॉस्ट देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT