Benelli ची Tornado Naked Twin 500 बाईक 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. नुकतेच इटलीतील मिलान येथे झालेल्या ऑटो शोमध्ये याचे प्रदर्शन करण्यात आले आहे. या स्टायलिश बाईकमध्ये ड्युअल रंग पर्याय उपलब्ध असेल. यात पॉवरफुल 500cc इंजिन असेल. हे लिक्विड कूल्ड इंजिन असेल जे हाय पॉवर जनरेट करेल.
हे जबरदस्त इंजिन 47.6 bhp पॉवर आणि 46 Nm टॉर्क जनरेट करेल. ही हायस्पीड बाईक असेल, जी काही सेकंदात वाऱ्याची गती प्राप्त करेल. सुरक्षेसाठी, बाईकच्या पुढील आणि मागील दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक असतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
डिझायनर हेडलाइटसह स्टाइलिश एक्झॉस्ट
सध्या कंपनीने ही बाईक भारतात लॉन्च करण्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. जागतिक बाजारपेठेत उतरल्यानंतर येथे ही बाईक सादर केली जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे. बाईकमध्ये डिझायनर हेडलाइट्ससह स्टायलिश एक्झॉस्ट असेल. यात डिस्क ब्रेकसह अलॉय व्हील्स मिळतील. (Latest Marathi News)
2024 Benelli Tornado Naked Twin 500 बाजारात KTM 990 Duke सारख्या बाईकशी स्पर्धा करेल. यात प्रोजेक्टर एलईडी लाईट्ससह बुमरँग आकाराचे डीआरएल असतील. लांबच्या प्रवासासाठी बाईकला मोठी इंधन टाकी मिळेल. ही स्ट्रीट बाईक मस्क्युलर फ्रंट लुकसह येते. यामध्ये 17 इंचाची व्हील्स मिळू शकतात. यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि टीएफटी कन्सोल असेल.
25 kmpl चा मायलेज मिळेल
सध्या Benelli TRK 502 बाजारात उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 500 सीसी इंजिन आहे. ही बाईक 25 kmpl चा मायलेज देते. Benelli TRK 502 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. या बाईकचे एकूण वजन 228 किलो आहे आणि त्यात 20 लीटरची इंधन टाकी आहे.
या बाईकची सीटची उंची 800 मिमी आहे, ज्यामुळे कमी उंचीचे लोकही ही बाईक सहज चालवू शकतात. Benelli TRK 502 ची एक्स-शोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे. ही बाईक एक प्रकारात आणि चार रंगात येते. यात 20 लिटरची इंधन टाकी आहे. Benelli TRK 502 मध्ये 46.9 bhp पॉवर आणि 46 Nm टॉर्क आहे. बाईकमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.